आश्वी चा लक्ष्मण  वाल्हेकर काँग्रेसचे नेते  राहुल गांधी यांच्या बरोबर करणार पंधरा राज्यातून सहा हजार किलोमीटर प्रवास 
संगमनेर /लोकवेध live न्यूज 
संगमनेर तालुक्यातील आश्वी येथील रहिवासी लक्ष्मण सदाशिव वाल्हेकर यांचे वाडवडील  पंडित जवाहरलाल नेहरू पासून काँग्रेसचे निष्ठावंत आणि आता लक्ष्मण हे ही निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून काँग्रेस बरोबर आहेत काँग्रेस शिवाय  देशाला पर्याय नाही असे म्हणत राहुल गांधी यांनी सुरू केलेल्या मणिपूर ते मुंबई  भारत जोडो न्याय यात्रेत सहभाग होण्यासाठी स्वखर्चाने गुहाटी येथे जाणार आहे संगमनेर ते मनमाड पर्यंत ते बसचा प्रवास करणार असून मनमाड ते गुहाटी असा रेल्वेचा प्रवास करून ते काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या भारत जोडो न्याय यात्रा सहभागी होणार आहे असे त्यांनी सांगितले
भारत जोडो न्याय यात्रा ही भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेली एक चळवळ आहे
ही यात्रा 15 राज्यात फिरणार असून जवळपास तीन महिने यात्रा सुरू असणार आहे जी 14 जानेवारी 2024 रोजी मणिपूरमधील थौबल येथून सुरू झाली आणि 20 मार्च 2024 रोजी मुंबईत संपेल
 देशात शेतकऱ्याच्या मालाला हमीभाव नाही शेतकऱ्याचा विचार कोणीच करत नाही सध्याचं सरकारही शेतकऱ्यांकडे लक्ष देत नाही देशात भ्रष्टाचाराला उत आला आहे देशात सर्वसामान्यांना काँग्रेसशिवाय पर्याय नाही  आम्ही काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून काम करत आहोत म्हणून राहुल गांधींनी सुरू केलेल्या भारत जोडो न्याय यात्रेत संगमनेरचा प्रतिनिधी म्हणून मी सहभागी होण्यासाठी चाललो आहे – लक्ष्मण वाल्हेकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!