महसूल  मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी केली संगमनेरातील दत्त मंदिराची स्वच्छता ; दिला स्वच्छतेचा धडा, 
संगमनेर/ लोकवेध live न्यूज 
 आयोध्‍येमध्‍ये उभे राहत असलेले प्रभू श्रीरामांचे मंदिर हे केवळ भक्ती आणि शक्‍तीचे केंद्र नसून, प्रचंड उर्जा, त्याग आणि दृढनिश्‍चयाच्‍या प्रतिका बरोबरच हिंदू अस्मितेचा स्‍त्रोत बनणार आहे. या एैतिहासिक क्षणाचा आनंद द्विगुणित करण्‍यासाठी गावोगावी आनंदोत्‍सव साजरा करावा असे आवाहन महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्‍यवसाय विकास मंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आयोध्‍येमधील श्रीराम मंदिराच्‍या लोकार्पण सोहळ्याच्‍या निमित्‍ताने मंदिर स्‍वच्‍छतेच्‍या केलेल्‍या आवाहानाला प्रतिसाद म्‍हणून, मंत्री विखे पाटील यांनी कार्यकर्त्‍यांसह संगमनेर बस स्‍थानका जवळील श्री दत्‍त मंदिरात स्‍वच्‍छता अभियान राबविेले. स्‍वच्‍छता कामगारांशीही त्‍यांनी संवाद साधून पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरीकाना त्‍यांनी मार्गदर्शन केले.
 का कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे राज्याचे महसूल मंत्री  नामदार राधाकृष्ण विखे पाटील होते
या प्रसंगी संगमनेर शहर प्रमुख श्री राम गणपुले, भाजपचे उत्तर महाराष्ट्राचे सहसयोजक विक्रम सिंह खताळ,संजय गांधी योजनेचे अध्यक्ष अमोल खताळ,शिवसेना तालुका प्रमुख रमेश काळे तालुका प्रमुख वैभव लांडगे, वसंतराव देशमुख, बापुसाहेब गुळवे, गोकुळ लाडंगे,दिपक भगत, जावेद जाहगीरदार,रोहीदास साबळे, डॉ कानवडे, युवा नेते शुभम देशमुख अजित पवार गटाचे आबासाहेब थोरात कपिल पवार आदीसह महायुतीतील घटक पक्षांचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
मंत्री विखे पाटील म्‍हणाले की, आयोध्‍येमध्‍ये भक्‍तीमय वातावरणात असलेला मंदिर लोकार्पण सोहळा हा प्रत्‍येक भारतीयांसाठी अभिमानाचा क्षण आहे. संपूर्ण भारत देश आता राममय झाला असून, रामलल्‍लाच्‍या स्‍वागतासाठी देश सज्‍ज झाला आहे. या एैतिहासिक क्षणामुळे लाखो हिंदूचे स्‍वप्‍न पुर्ण होत असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या कार्यकाळातील आणि भारताच्‍या इतिहासातील एक सुवर्ण पर्व ठरणार आहे असे स्‍पष्‍ट करुन, एकीकडे देश आज मोदीजींच्‍या नेतृत्‍वाखाली विश्‍वगुरु बनण्‍याच्‍या संकल्‍पावर यशस्‍वीपणे वाटचाल करीत आहे. जगातील तिसरी मजबुत अर्थव्‍यवस्‍था म्‍हणून भारत देशाची ओळख आता जगामध्‍ये निर्माण होत आहे. याच एैतिहासिक पर्वामध्‍ये श्रीराम मंदिराचे होत असलेले लोकार्पण ही देशवासि‍यांच्‍या दृष्‍टीने मोठी एैतिहासिक घटना घडत आहे. या आनंदामध्‍ये सर्वांनीच सहभागी होण्‍याचे आवाहन त्‍यांनी केले.
संगमनेर शहरात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभारण्यासाठी जिल्हा नियोजन व विकास समितीतून एक कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून शहरातील मारुती मंदीराच्या सभामंडपाच्या निधीस तत्वता मान्यता दिल्याचे सांगून आयोध्येतील कार्यक्रमाच्या क्षणाचे औचित्य साधून निळवंडे धरणांच्या उजव्या कालव्यातून पाणी सोडण्यात येणार असल्याचे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!