अयोध्येमध्ये अवतीर्ण होत असून हा भाग्याचा क्षण आहे. हा आंनदोत्सव म्हणून 22 जानेवारी ला हिंदू नी दिवाळीचा सण साजरा करा – समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर 

अकोले / लोकवेध live न्यूज 

त्रेतायुगातील राम कलियुगात अयोध्येमध्ये अवतीर्ण होत असून हा भाग्याचा क्षण आहे. हा आंनदोत्सव म्हणून 22 जानेवारी ला हिंदू नी दिवाळीचा सण साजरा करावा असे आवाहन समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांनी केले आहे.
अगस्ती ऋषी आश्रम अकोले येथे श्रीराम जन्मभूमी अयोध्या मंदिर आंनदोत्सव च्या निमित्ताने रामभक्त परिवाराच्या वतीने आयोजित कीर्तन व जेष्ठ वारकरी सन्मान सोहळ्यात
” धन्य मी मानीन आपुले संचित,
राहिलीसे प्रीत तुझे नामी ”
या तुकाराम महाराज यांचे स्थिती पर अभंगावर निरूपण करताना इंदुरीकर महाराज यांनी केले.
यावेळी माजी आमदार वैभवराव पिचड, अगस्ती देवस्थान चे अध्यक्ष के.डी. धुमाळ, विश्वस्त दिपक महाराज देशमुख, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दिपक जोंधळे, राजेंद्र महाराज नवले, अरुण महाराज शिर्के, गणेश महाराज वाकचौरे, रमेश महाराज भोर, विवेक महाराज केदार, विठ्ठल पंत गोंडे, देवा महाराज वाकचौरे, अकोले एजुकेशन चे अध्यक्ष सुनील दातीर, राहुल देशमुख, भाऊसाहेब वाकचौरे, गुलाबराव शेवाळे, किसनशेठ लहामगे, रामनाथ मुतडक आदी उपस्थित होते.
अकोले तालुका खूप भाग्यवान असून प्रभू श्रीराम यांच्या जीवनातील अनेक वर्ष अकोलेच्या परिसरात गेले असून, सत्वशील राजा हरिश्चंद्र, महामुनी अगस्ती, निष्ठावान जटायु यांचे महात्म या परिसरात घडले असून ज्ञानेश्वरी मध्ये अगस्तय महात्मे सांगितले आहे. अश्या या पावन भूमीत अयोध्याच्या मंदिरात प्रभू श्रीराम यांच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा होत असताना आपण दीपोत्सव साजरा करावा असे आवाहन इंदुरीकर महाराज यांनी केले.
भाऊ, मुलगा, पती, बाप, सखा, राजा अन देव कसा असावा तर प्रभू श्रीरामा सारखा म्हणून राम आपला आदर्श आहे.
गाय कत्तलखान्यात, साधूंचा अपमान अन धर्म बुडायला लागला तर देव अवतार धारण करतो. नरदेह मिळणे भाग्याची गोष्ट असून जीवन हे तीन अंकी नाटक आहे. जीवनात परमार्थ करावा तो पुण्याचा असून त्यात आनंद मिळतो परमार्थात वय वाढले तर किंमत वाढते या उलट संसार असून संसारचा शेवट दुःखात होतो असेही इंदुरीकर महाराज यांनी सांगितले.
यावेळी गायनाचार्य किरण महाराज शेटे, इंद्रभान कोल्हाळ, कृष्णा महाराज देशमुख, मृदंगाचार्य संकेत महाराज आरोटे, सचिन महाराज चौधरी, नितिन महाराज देशमुख, रमेश महाराज देशमुख यांनी संगीत साथ दिली. कृष्णचंद्र, कोतुळेश्वर, लिंगेश्वर वारकरी शिक्षण संस्था चे विध्यार्थी यांनी हरिपाठ केला.
यावेळी जेष्ठ वारकरी यांचा सन्मान करण्यात आला. ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख यांनी संत भोजन पंगत दिली. संकेत महाराज आरोटे यांचे मृदंगाच्या तालावर सर्व टाळकरी व श्रोत्यांनी ताल धरला. किरण महाराज शेटे, इंद्रभान महाराज कोल्हाळ यांच्या आवाजातील राम भक्ती गीतानी सर्वांना मंत्रमुग्ध केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!