श्रीराम मंदिर अयोध्या प्राणप्रतिष्ठाण सोहळ्या निमित्ताने शेडगाव येथे विविध भव्य दिव्य कार्यक्रम सादर….
संगमनेर / लोकवेध Live न्यूज (भाऊसाहेब फड मुख्य विशेष प्रतिनिधी)
श्रीराम मंदिर अयोध्या प्राणप्रतिष्ठा सोहळा २२/०१/२०२४ सोमवारी अयोध्या येथे अनेक भव्य दिव्य कार्यक्रम झाले
तसेच संपूर्ण भारतात सर्वत्र प्रत्येक शहर व ग्रामीण भागात अनेक कार्यक्रम झाले
अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील शेडगाव येथे सोमवारी अनेक भव्य दिव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते
त्यामध्ये संपुर्ण गावात गुडी उभारुन रांगोळी काढण्यात आली होती शेडगावातील सर्व छोटी मोठी मंदिरावरती आकर्षक लायटिंग टाकुन लक्ष्मीमाता मंदिरासमोर पताका लावण्यात आल्या होत्या व शेडगावात विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले
संध्याकाळी ६ वाजता श्रीराम प्रतिमेची भव्य दिव्य व आकर्षक मिरवणुक काढण्यात आली
संध्याकाळी ७ ते ९ यावेळेत लक्ष्मी माता मंदीरासमोर समाज प्रबोधनकार हभप सुनिल महाराज पवार यांचे जाहिर हरी किर्तन झाले व त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते
लावुन गुडी उभारावी व प्रत्येकाने सोमवारी संध्याकाळी प्रत्येक घरापुढे रांगोळी काढुन व पणत्या लावण्यात आल्या होत्या व प्रत्येकाने आपल्या घरावरती गुडी उभारून भगवा ध्व्ज लावण्यात आले होते
शेडगाव येथील सर्व तरुण मित्र मंडळ व सर्व बचतगट महिला सर्व ग्रामस्थांनी व प्रंचकोषीतील भाविक भक्तांनी विविध कार्यक्रमांचा सहभागी होऊन आस्वाद घेतला
भव्य दिव्य मिरवणुकीत मध्ये शेडगाव येथील सर्व तरुण मित्र मंडळ व सर्व ग्रामस्थ व सर्वाधिक महिला उपस्थित होत्या
यावेळी हभफ सुनिल महाराज पवार यांच्या किर्तनात सर्व दंग होऊन आस्वाद घेतला
यावेळी रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते या शिबिरात युवक व ग्रामस्थ व महिला यांनी आपले रक्तदान केले
शेडगाव येथील सर्व ग्रामस्थ व लहान थोर मंडळी व मुंबई पोलीस सर्वच भाविक भक्तांनी तन मन धनाने इच्छा शक्ती या कार्यक्रमासाठी मदत व काहींनी तर या कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य व काहींनी सौजन्य दिले
श्रीराम मंदिर अयोध्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्तने हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी
आयोजक शेडगाव सर्व तरुण मित्र व सर्व ग्रामस्थ यांनी हा कार्यक्रम यशस्वी केला
