प्रभू श्रीराम मूर्ती प्रतिष्ठापनेने अवघे पिंपरणे राममय !
उत्सव, सन्मान व प्रसाद वाटपाने सर्वत्र आनंदोत्सव
पिंपरणे / लोकवेध live न्यूज

अयोध्या याठिकाणी होणाऱ्या भव्य श्री राम मंदिराची प्रतिष्ठापने निमित्त देशभरात उत्सव साजरा केला जात असताना संगमनेर तालुक्यातील पिंपरने गावात देखील समस्त युवा वर्गाने व समस्त राम भक्तांनी एकत्र येत मोठ्या जल्लोषात वेगळे कार्यक्रम घेऊन रामलल्ला मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा साजरा केला. सर्वच युवकांनी व रामभक्तांनी गावात व वाड्यावस्त्यावर घरोघरी जात अक्षदा व कार्यक्रम पत्रिकेचे वाटप करत जनजागृती केली तर गावची शान असलेल्या श्री हनुमंत रायाच्या मंदिराची स्वच्छता करत आकर्षक अशी विद्युत रोषणाई करत सोमवारी भल्या पहाटे श्री हनुमान मंदिरात काकड आरतीने कार्यक्रमाची सुरुवात होऊन त्यानंतर होम
हवन, अभिषेक, भजन, कीर्तन, नामस्मरण व श्री राम जयघोषाने संपूर्ण गाव दिवसभर राम नामात तल्लीन झालेला होता. संध्याकाळी आकर्षक अशा सजावट केली होती पूर्ण मंदिर ११११ पण त्या लावून दीप प्रज्वलन केले

गावातील भजनी मंडळी देखील टाळ मृदुंगाच्या
तालावर राम कृष्ण हरी चा ठेका धरला
गावातील प्रत्येक गल्ली बोळ आकर्षक अशा रांगोळीने, फुलांच्या सजावटीने,भगव्या पताका व ध्वजाने सजलेल्या पाहावयास मिळत होत्या. तर महिला भगिनी स्वयंस्फूर्तीने आपल्या दारापुढे सडा रांगोळी काढली होती सायंकाळी श्रीरामांच्या प्रतिमेचे पूजन करून प्रभू श्रीरामांची आरती घेण्यात आली त्यानंतर आलेल्या सर्व भाविकांना लापशीच्या महाप्रसादाचे वाटप वाटप करण्यात आले
हा संपूर्ण कार्यक्रम यशस्वीतेसाठी गावातील सर्व युवकांनी तसेच राम भक्तांनी तसेच भजनी मंडळांनी एकत्र येत अथक परिश्रम घेतले तर या कार्यक्रमास मोठ्या संख्येने गावातील लहान थोर भाविक भक्त महिला पुरुष उपस्थित होते.

