वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सतर्कतेमुळे मवेशी येथिल शेकडो नागरिकांचा वाचला जीव – मारुती मेंगाळ
अकोले तालुक्यातील मवेशी येथे 200 पेक्षा अधिक नागरिकांना विष बाधा — मोठी दुर्घटना टळली.
राजूर / लोकवेध live न्यूज
मागील आठवड्यात काही दिवसापूर्वी अकोले तालुक्यातील मवेशी येथे हळदीच्या कार्यक्रमात जेवण केल्याने तब्बल 200 पेक्षा अधिक नागरिकांना विष बाधा झाल्याने त्यांना उपचारासाठी राजूर ,कोहने, खिरविरे येथे सरकारी दवाखान्यांमध्ये हलविण्यात आल्याने माजी उपसभापती मारुती मेंगाळ यांनी राजूर येथे जाऊन रुग्णांची भेट घेतली या प्रसंगी ते माध्यमांशी बोलत होते.ते म्हणाले की, मवेशी येथे घडलेला प्रकार अत्यंत गंभीर आणि धक्कादायक होता. वैद्यकिय अधिकारी सतर्क नसते, आणि योग्य वेळी उपचार भेटले नसते,तर मोठी दुर्घटना घडली असती. वैद्यकिय अधिकाऱ्यांच्या सतर्कतेमुळे शेकडो नागरिकांचा जीव वाचवू शकला अशी भावना माजी उपसभापती मारुती मेंगाळ यांनी व्यक्त केली.
दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे की सध्या सर्वत्र लग्न सराई मोठ्या प्रमाणात सुरू आहे. मागील आठवड्यात काही दिवसापूर्वी अकोले तालुक्यातील मवेशी येथे हळदीच्या कार्यक्रमात जेवण केल्याने त्या जेवणातून विष बाधा होऊन तब्बल 200 पेक्षा अधिक नागरिकांना त्रास झाल्याने काही तासांनंतर त्यांना मिळेल त्या साधनांनी राजूर ग्रामीण रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल केले.यात लहान मुलांचा देखिल समावेश आहे.तातडीने योग्य ते उपचार त्यांच्यावर झाल्याने त्या सर्व नागरिकांची प्रकुर्ती आता चांगली आहे.त्यांच्यावर राजूर , कोहणे, खिरविरे ,नाशिक या सरकारी दवाखान्यांमध्ये उपचार सुरू असून आज उपसभापती मारुती मेंगाळ यांनी राजूर येथे जाऊन रुग्णांची भेट घेतली. त्यांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.या सर्व नागरिकांना तातडीने उपचार करून त्या सर्वांचा जीव ज्यांनी वाचवला त्या राजूर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.दिघे, डॉ. बांगर यासह सर्व कर्मचारी वर्गाचा सन्मान केला.यावेळी सुरेश पथवे,विलास उघडे,कांताराम मेंगाळ, अजय भांगरे,अजय उघडे,नवनाथ उघडे,अक्षय शिंदे यांसह आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
