आ. थोरात यांच्या उपस्थितीत मोठ्या आनंदोत्सवात उजव्या कालव्याचे जलपूजन
संगमनेर / लोकवेध live न्यूज
हिवरगाव पावसा येथे उजव्या कालव्याचे जलपूजन आमदार बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते करण्यात आले .यावेळी ते बोलत होते याप्रसंगी व्यासपीठावर मा. आमदार डॉ सुधीर तांबे, ॲड माधवराव कानवडे, आर.बी राहणे ,उत्तमराव घोरपडे, गणपतराव सांगळे, रामदास पाटील वाघ ,रामहरी कातोरे, मिलिंद कानवडे ,डॉ प्रमोद पावसे, तानाजी आहेर, नानासाहेब खर्डे, विजय राहणे, कैलास पानसरे, सुभाष गुंजाळ, रमेश गुंजाळ आदींसह पंचक्रोशीतील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते
आमदार थोरात म्हणाले की, सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी चिंचोली गुरव येथे घेतलेल्या पाणी परिषदेतून निळवंडे येथे धरणाचा निर्णय झाला. या कामासाठी सातत्याने पाठपुरावा केला. आपण 1999 मध्ये पाटबंधारे राज्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर खऱ्या अर्थाने कामाला गती मिळाली. अनेक अडचणीतून सातत्याने या कामासाठी निधी उपलब्ध केला. धरणाबरोबर डाव्या आणि उजव्या कालव्याचे काम आपणच मार्गी लावले .
आमदार डॉ तांबे म्हणाले की, सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी निळवंडे धारणासाठी जागा निवडली. त्यामुळे वरच्या भागातून कालवे आले .जास्तीत जास्त भागाला पाणी देण्यासाठी आमदार बाळासाहेब थोरात यांनी नियोजन केले आहे .पाणी देणारे कोण आहे आणि या कामाचे श्रेय कोण लाटू पाहते आहे हे जनतेला कळत आहे अशी टीकाही त्यांनी केली
यावेळी तालुकाध्यक्ष मिलिंद कानवडे ,उत्तमराव घोरपडे, नानासाहेब खर्डे, आराध्या गायकवाड, प्रमोद पावसे आदींनी मनोगत व्यक्त केली
गावोगावी जोरदार जंगी मिरवणुकीने आमदार थोरात यांचे स्वागत
ये बंधा लय जोरात, बाळासाहेब थोरात या गीतावर गावोगावी मोठ्या जल्लोषात तरुणाईने आमदार बाळासाहेब थोरात यांचे गावोगावी जंगी स्वागत केले. यावेळी प्रत्येक गावच्या शेकडो सुवासिनीने औक्षण करत पाण्याचे जलपूजन केले. तर ढोल ताशा व पारंपारिक गजरामध्ये झाले मध्ये हे अभूतपूर्व सोहळे संस्मरणीय ठरले आहेत
