पिंपरणेत निळवंडे उजव्या कालव्याच्या पाण्याचे सरपंच नारायण मरभळ यांच्या शुभ हस्ते जलपूजन संपन्न
पिंपरणे / लोकवेध live न्यूज
काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या अथक प्रयत्नातून निळवंडे धरण व डावा आणि उजवा कालवा पूर्ण झाला. त्यामुळे दुष्काळी भागातील जनतेसह महाराष्ट्राने त्यांना जलनायक पदवी दिली, निळवंडे धरण आणि कालवे आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले. हे तालुक्यातील लहान मुलापासून वृद्धांपर्यंत माहिती आहे. ज्यांनी आमदारकी, मंत्रीपद या कामासाठी पनाला लावले. ते आमदार थोरात जलनायक आहेत. मात्र निळवंडे धरण आणि कालव्यांच्या कामाला ज्यांनी विरोध केला. ते लोक आज श्रेय घेण्याचा केविलवाना प्रयत्न करत आहेत असे प्रतिपादन पिंपरणे गावचे सरपंच नारायण मरभळ यांनी निळवंडे उजव्या कालव्याच्या पिंपरने येथील जल पूजन प्रसंगी केले .
यावेळी सरपंच नारायण मरभळ, राजेंद्र देशमुख, अजित मांडे, विनोद साळवे, गंगाराम वाघचौरे अरुण राहींज, रमेश राहींज, प्रदीप रकटे, शुभम काळे यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले पिंपरनेच्या दक्षिण भागाकडील सर्व शेती ओलिताखाली येणार असल्याचा आनंद सर्वांच्या चेहऱ्यावर दिसत होता फटाके वाजून डीजे च्या तालावर सर्वजण आबाला वृद्ध नाचत होते महिलाही यावेळी आनंदाच्या भरात नाचत होत्या सर्वांना पेढे वाटून एकमेकांना पेढे भरवत हा आनंद उत्सव साजरा करण्यात आला
