मालुंजेकरांची अनेक वर्षांची तहान भागणार  ; निळवंडे धरणाच्या   उजव्या कालव्याचे पाणी आले गावात 
 महिला व ग्रामस्थ यांच्या हस्ते निळवंडे उजव्या कालव्याचे  जलपूजन संपन्न
 पिंपरणे / लोकवेध live न्यूज 
मांलुजे हे कायमस्वरूपी दुष्काळी भागातील गाव होतं , कतीही पाऊस झाला तरी तात्पुरती ओलिताची परिस्थिती रहायची, आता बारमाही सुजलाम सुफलाम शेती होणार आहे, महसूल दुग्धव्यवसाय पशुसंवर्धन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे-पाटील, खासदार डॉ सुजय दादा विखे पाटील यांच्या माध्यमातून पाणी काल रात्री या मांलुजे गावात  पोहचले आम्ही खर्या अर्थाने धन्य झालो आहे, शेतकरी सुखावला आहे, अशी प्रतिपादन मालुंजेचे सरपंच संदीप घुगे यांनी कालव्याचे पाणी पूजन प्रसंगी केले
 पावसाच्या पाण्याशिवाय इतर कोणताही जलस्त्रोत उपलब्ध नसलेले गाव म्हणजे मालुंजे पावसाच्या पाण्याशिवाय शेतीसाठी पाणी नाही त्यामुळे अनेक वर्षापासून रखडलेले निळवंडे कालवे  याद्वारे येणारे पाणी हाच एक शाश्वत पर्याय होता निळवंडे धरण उभे राहिले त्यानंतर दोन्ही कालव्यांना पाण्याचा प्रश्न होता तोही आता प्रश्न सुटला आणि सरते शेवटी उजव्या कालव्याला पाणी येऊन  मालुंजेकरांना गावात पाणी पोहोचले याचा आनंद उत्सव ग्रामस्थांनी नाचत बागडत पेढे वाटून केला गावातील ग्रामस्थ महिला यांच्या शुभहस्ते या पाण्याचे पूजन करण्यात आले  पारंपारिक वाद्यावर महिला भगिनी पुरुष गुलाल उधळून नृत्य केले रात्रीची वेळ असूनही  हजारोच्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी महिलांची संख्या लक्षणीय होती आलेल्या पाण्याला 500 तोफांची सलामी  दिली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!