आगामी काळात राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येणार
राज्यातील सरकारमध्ये ताळमेळ नाही
नांदुरी दुमाला येथे उजव्या कालव्याचे जलपूजन
संगमनेर / लोकवेध live न्यूज
नांदुरी दुमाला येथे उजव्या कालव्याचे जलपूजन आमदार थोरात यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते. यावेळी समवेत मा. आमदार डॉ सुधीर तांबे, ॲड माधवराव कानवडे , रणजीतसिंह देशमुख, साहेबराव कवडे ,लहानभाऊ पा गुंजाळ, संपतराव डोंगरे, आर. बी राहणे , तालुका अध्यक्ष मिलिंद कानवडे , रमेश गुंजाळ , दुध संघाचे संचालक विलास कवडे, मारुती कवडे, ॲड मीनानाथ शेळके, सरपंच सौ अर्चनाताई शेळके ,सोमनाथ गोडसे आदींसह विविध पदाधिकारी उपस्थित होते..
यावेळी बोलताना आमदार थोरात म्हणाले की, १९८९ मध्ये भंडारदर्याच्या हक्काच्या पाण्याकरता मोठा लढा झाला. त्यानंतर निळवंडे धरण व कालव्यांसाठी आपण सातत्याने पाठपुरावा केला. आदर्शवत पुनर्वसन केले, मागील अडी वर्षाच्या काळात महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून मोठा निधी मिळवला. त्यामुळे कालव्यांची कामे पूर्ण झाली. कोरोना संकटात शंभर फूट उंचीवर जाऊन म्हाळादेवी जलसेतूची पाहणी केली. अविरतपणे काम सुरू ठेवले काम कोणी केले आहे हे सर्व जनतेला माहिती आहे. ज्यांनी या कामात कधी मदत केली नाही, अडचणी निर्माण केल्या तेच लोक आता श्रेय घेण्यासाठी खटाटोप करत आहेत मात्र जनता त्यांना ओळखून आहे.
संगमनेर तालुका हा विकासातून वैभवाकडे वाटचाल करतो आहे येथील सहकार, सुसंस्कृत राजकारण सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची पद्धती ही राज्यासाठी आदर्शवत आहे.
सध्या राज्य सरकारमध्ये ताळमेळ नाही एकमेकावर होणारी शाब्दिक हल्ले चांगले नाही आपण लोकशाही व संविधानावर विश्वास ठेवून काम करत असून आगामी काळात राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर येईल असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला
तर माजी आमदार डॉ. तांबे म्हणाले की , निळवंडे धरण आणि कालवे हे फक्त आमदार बाळासाहेब थोरात यांच्या पाठपुराव्यातूनच झाले आहे. बाकीचे आता कितीही प्रसिद्धीसाठी खटाटोप करत असले तरी जनता त्यांच्या भूलथापांना बळी पडत नाही
तर माधवराव कानवडे म्हणाले की , आमदार बाळासाहेब थोरात यांनी सातत्याने पाहण्यासाठी संघर्ष केला आहे. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्याकडून संघर्षाच्या वारसा घेताना आमदार थोरात पाण्यासाठी लढले आहे. त्यांच्या माध्यमातून मिळालेले पाणी हे पुढील अनेक पिढ्यांसाठी समृद्धी निर्माण करणारे आहे.
यावेळी मारुती कवडे , मीनानाथ शेळके , विलासराव कवडे यांचीही भाषणे झाली या प्रसंगी सतीश खताळ , बाळासाहेब कानवडे , शिवाजी बलवे , सोन्याबापू नेहे , लता खताळ , सिताराम शेटे , नारायण नेहे , भास्कर गोपाळे , आदींसह परिसरातील नागरिक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जेसीबीतून फुलांची उधळण करत आमदार थोरात यांचे भव्य स्वागत
उजव्या कालव्यातून दुष्काळी भागाला पाणी देणारे आमदार बाळासाहेब थोरात हे महाराष्ट्राचे खरे जननायक असून त्यांच्या स्वागतासाठी नांदुरी दुमाला व परिसरातील नागरिकांनी जेसीबी साह्याने पुष्पवृष्टी करत मोठ्या जल्लोषात स्वागत करत भव्य मिरवणूक काढली .
