खरशिंदेत आ.थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त नेत्ररोग व मोतीबिंदू शिबिर संपन्न
संगमनेर / लोकवेध live न्यूज 
संगमनेर तालुक्यातील खरशिंदे येशील सामाजिक कार्यकर्ते तसेच आ.बाळासाहेब थोरात यांचे खंदे समर्थक भैय्या इनामदार व अण्णासाहेब वाडेकर यांच्या सहयोगातून व  दर्शन रोटरी नेत्र नेत्र रुग्णालय संगमनेर यांच्या संयुक्त विद्यमाने संगमनेर तालुक्याचे
भाग्यविधाते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसा निमित्त खरशिंदे गावात विवीध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले तसेच भव्य मोफत नेत्र रोग निदान मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे  आयोजन करण्यात आले
 भैया इनामदार व अण्णासाहेब वाडेकर यासह सरपंच सविता वाडेकर सोसायटीचे व्हा.चेअरमन बाळासाहेब पंडित,पंढरीनाथ गायकवाड , राजेंद्र भुसारी, शरद भुसारी गोरख जगधने रियाज शेख मच्छिंद्र वाडेकर ठका वाडेकर उपस्थित होते
यावेळी जिल्हा परिषद शाळेतील मुले तसेच आबाल वृद्धासह महिलांच्या डोळयांची तपासणी करण्यात आली जवळपास १०० च्या पेक्षाही जास्त नागरिकांनी  या शिबीराचा लाभ घेतला. यावेळी डॉक्टर रोहित शिंदे यांनी डोळे  केली तर गौरव जोशी व सिकंदर निसार यांनी सहाय्य केले
यावेळी गावातील जेष्ट नागरीकांनी सामाजीक कार्यकर्ते भैय्या इनामदार यांचे  आभार मानले यांच्या मार्गदर्शनाखाली गावात सतत सामाजिक धार्मिक कार्यक्रम सुरू असतात यावेळी ग्रामस्थांनीआ.बाळासाहेब थोरात साहेबांचे धन्यवाद मानले व साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!