संगमनेर जिल्हा म्हणून घोषित करा अन्यथा आत्माराम देशमुख यांचा इशारा
संगमनेर / लोकवेध live न्यूज
संगमनेर जिल्हा म्हणून घोषित करा अन्यथा ओझर खुर्द येथील दोन्ही कालव्यांना पाणी सोडू देणार नाही असा इशारा आत्माराम देशमुख यांनी दिला आहे असे लेखी निवेदन
माननीय नामदार- राधाकृष्णजी विखे पाटील मा. जिल्हाधिकारी साहेब, यांना लेखी निवेदन पाठवले आहे या निवेदनात त्यांनी असे म्हटले आहे की
“तात्काळ संगमनेर जिल्हा सुरु करावा नम्र विनंती. श्रीरामपूर तालुका-जन्माला आला नव्हता तेव्हां पानोडी येथील सरदार साहेब, धांदरफळ बु येथील आमदार- के. बी. दादा देशमुख व निमगांव बु खा. कानवडे यांनी आख्या अहमदनगर जिल्हयाचे नेतृत्व केले. मग आम्ही संगमनेरकर जिल्हयाचा हक्क कसा सोडणार. कुठल्याही परिस्थितीत नियमा नुसार संगमनेर जिल्हा हा होणारच त्याशिवाय आम्ही हटणार नाही. जर शासनाने पार्सलेटी केली तर आम्ही संगमनेर तालुक्यातील ओझर खुर्द येथील दोन्ही कालवे चालू देणारच नाही याची गंभीर नोंद व होणारे परिणामास सर्वस् जबाबदार सरकारवर राहिल याची नोंद घ्यावी.
संगमनेरच्या जनतेच्या वतीने आत्माराम देशमुख यांनी लेखी निवेदन दिले
