शूर सरदार त्रिंबकजी डेंगळे यांचे नाव देशात अजरामर आहे..-  माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात

निमगाव जाळी / लोकवेध live न्यूज / अशोक गोसावी

एक कर्तृत्ववान ऐतिहासिक पुरुष म्हणून शूर सरदार त्रिंबकजी डेंगळे यांचे नाव आज देशात अजरामर आहे.संधी मिळाली तर मराठा तरुण आपले कर्तृत्व दाखवू शकतो याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे शूर सरदार त्र्यंबकजी डेंगळे होय. सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात (दादा) यांच्या जन्म शताब्दी निमित्त स्व वामनराव जोंधळे ग्रामीण बहुद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने निमगांव जाळी ता. संगमनेर येथील 75 वर्षापुढील 100 ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान तसेच विविध विकास कामांचे भूमीपूजन लोकनेते माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात व माजी.आ.डाॅ.सुधीर तांबे यांच्या हस्ते आज संपन्न झाले.यामध्ये प्रामुख्याने खंडोबामंदिर सभामंडप भूमिपुजन, शुर सरदार त्रिंबकजी डेंगळे स्मारकाचे भूमिपूजन व दूधेश्वर मंदिराच्या पायऱ्यांचे रिलिंग बसविणे या कामांचा समावेश आहे.तसेच साहेबांच्या वाढदिवसा निमित्त गावातील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शालेय गणवेश वाटप यावेळी करण्यात आले .उपस्थितांना मार्गदर्शन करताना मा. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले की आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने माझी व संगमनेर तालुक्याची वाटचाल झालेली आहे. आपले गाव या मतदारसंघात असताना जेवढ्या निवडणुका झाल्या त्या सर्व वेळी या गावाने मला भरभरून असे सहकार्य केले. कधी कधी खूप धाक,दबाव ,भीती असायची तरीही खूप आनंदाने निमगाव जाळीकरांनी मला मतदान केले.माझ्या या यशात तुमचा खूप मोठा वाटा आहे.तसे तर या गावाला खूप मोठा असा थोर ऐतिहासिक वारसा त्रिंबकजी डेंगळे यांच्या रूपाने लाभलेला आहे सरदार त्रिंबकजी डेंगळे यांचे यथोचित असे स्मारक तुम्ही करता ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट असून शूर सरदार त्रिंबकजी यांनी आपल्या खडतर परिश्रमाने मराठी साम्राज्याच्या कारभारी पदापर्यंत मार्गक्रमण केले हा त्यांचा जीवन प्रवास खरे तर चित्ररूपाने प्रसारित झाला पाहिजे कारण मराठी साम्राज्य टिकवण्याचे महान कार्य त्रिंबकजीनी केले आहे. इंग्रज त्रिंबकजींना घाबरत होते.त्र्यंबकजींना संपवल्याशिवाय मराठी राज्य आपल्या ताब्यात येणार नाही हे इंग्रज समजून होते. असा ह्या ऐतिहासिक वारसाची जपणूक करणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. सरपंच प्रतिभा जोंधळे प्रतिष्ठानचे अध्यक्ष सोमनाथ जोंधळे व तान्हाजी जोंधळे यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमास मा.नगराध्यक्ष सौ.दुर्गाताई तांबे, राजहंस दुध संघाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख, एकविरा फाउंडेशन अध्यक्षा डाॅ.जयश्रीताई थोरात, मार्केटचे उपसभापती गीताराम गायकवाड, गावच्या लोकनियुक्त सरपंच प्रतिभा जोंधळे, विविध सेवा सहकारी सोसायटी चे संचालक सोमनाथ जोंधळे, नवनाथ आंधळे, ग्रा प, सदस्य माऊली डेंगळे, तान्हाजी जोंधळे, संजय वदक,सोमनाथ खरात,दत्तू तळोले, निलेश तांबे, विजय जोंधळे, मच्छिंद्र तांबे, बबनराव जोंधळे,रंगनाथ वदक,परशुराम जोंधळे, अशोक भोसले,वसंतराव जोंधळे,मोहन वदक,जनार्दन वदक,रघुनाथ तांबे, भाऊसाहेब वदक, अण्णा थोरात,रवींद्र खरात, यांच्यासह पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक लोकनियुक्त सरपंच प्रतिभा जोंधळे यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार सोमनाथ जोंधळे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!