प्रमिला पंडोरे यांची जिल्हा शिक्षकेतर संघावर निवड
निमगाव जाळी / लोकवेध live न्यूज अशोक गोसावी
रयत शिक्षण संस्थेच्या नानासाहेब सहादू कडू पाटील विद्यालय व बापूजी सहादू कडू पाटील कनिष्ठ महाविद्यालय सात्रळ ता.राहुरी येथील लेखनिका सौ प्रमिला जयसिंग पंडोरे यांची अहमदनगर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा शिक्षककेतर संघ अहमदनगर या संघटनेच्या जिल्हा कार्यकारणी सदस्य पदी एकमताने निवड करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा महासचिव पाराजी मोरे व मार्गदर्शक समशेर पठाण यांनी दिली. त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचे रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष अरुण कडू पाटील, संभाजीराव चोरमुंगे पा. बबनराव कडू पा.ॲड. विजयराव कडू पा, भास्करराव फणसे.पंकज कडू पा.,किरण कडू पा.भाऊसाहेब पेटकर,प्राचार्य राजेंद्र बडे,पर्यवेक्षिका एस आर थोरात,पत्रकार किशोर भांड ,पत्रकार अशोक गोसावी, सर्व स्थानिक स्कूल कमिटी सदस्य,शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले आहे.
