पोदार इंटरनॅशनल विद्यालय ओझर तर्फे शिवजयंती निमित्ताने भव्यदिव्य रॅलीचे आयोजन

नाशिक / लोकवेध live न्यूज 

इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर, मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर, राज्य करणारा राजा म्हणजे राजे शिवछत्रपती.. यांना मानाचा मुजरा! शिवजयंती निमित्ताने पोदार इंटरनॅशनल स्कूल तर्फे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषात भव्यदिव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. सर्वप्रथम ओझर येथील खंडेराव महाराज यात्रा मैदान येथे कार्यक्रमाची सुरवात कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या माननीय वैशाली ताई अनिल कदम, पोलिस अधिकारी विद्यालयाच्या प्राचार्या डॉ. जसिंथा पारके, श्रावणी कमूजु, विशाल मेंढे यांच्या हस्ते प्रतिमापूजन, दीपप्रज्जवलन आणि छ. शिवाजी महाराजांच्या आरतीने करण्यात आली. त्यानंतर विद्यालयाच्या प्राचार्या डॉ. जसिंथा पारके यांच्या हस्ते प्रमुख पाहुण्यांना शाल, श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या माननीय वैशालीताई अनिल कदम यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना शिवाजी महाराजांचे आचार विचार सदैव आचरणात आणण्याचे आणि स्त्री शक्तीचा सन्मान करण्याचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केले.
विद्यालयातील इयत्ता दुसरीची विद्यार्थिनी आराध्या भार्गवे हिने उत्कृष्ट शिवगर्जना सादर केली. तिच्या शिवगर्जनेला सर्वांकडून भरपूर दाद मिळाली. त्यांनतर तेथून रॅली ला सुरवात करण्यात आली. या रॅली मध्ये विद्यालयातील इयत्ता चौथी ते नववी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग होता. त्यामध्ये झेंडा पथक, ढोल पथक, लेझीम पथक, शिवाजी महाराजांचे मावळे असे अतिशय मनमोहक सादरीकरण करण्यात आले होते. रॅली ची सुरुवात खंडेराव महाराज यात्रा मैदान येथून सिन्नरकर टाऊन, पंडित कॉलनी त्यानंतर पंचवड नगर या मार्गादरम्यान आयोजित करण्यात आली होती. रॅलीतील विद्यार्थ्यांच्या उस्फूर्त घोषणाबाजीने, उत्कृष्ट ढोल पथक आणि लेझीम पथकाने सर्व लोकांचे लक्ष वेधून घेतले. रॅली दरम्यान शिव रथाचे आयोजन देखील करण्यात आले होते. त्या शिव रथातून विद्यालयातील विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, माता जिजाऊ, सईबाई, तानाजी, बाजीप्रभू यांची सुंदर प्रतिकृती सादर केली. या भव्यदिव्य शिव रॅलीसाठी विद्यालयाच्या प्राचार्या डॉ. जसिंथा पारके यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले. त्याचप्रमाणे विद्यालयातील सर्व शिक्षक वृंदांनी आपला मोलाचा सहभाग दर्शवला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!