स्वकर्तृत्वावर स्वराज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज पहिले राजे – शिवव्याख्याते अप्पासाहेब गायकवाड
पिंपरणेत शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी
पिंपरणे / लोकवेध live न्यूज
छत्रपती शिवाजी महाराजांनी समाजातील अठरापगड जाती-जमातींना बरोबर घेऊन स्वराज्य उभारून लोककल्याणकारी शासन व्यवस्था त्यांनी निर्माण केली. सर्वांच्या प्रगतीसाठी कार्य करणारे तसेच लोकशाहीचा पाया घालून संपूर्ण जगाला सर्वधर्मसमभावाची शिकवण देणारे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांनी धर्मग्रंथ, धर्मस्थळ, स्त्रिया, लहान मुलं यांचा सर्वांनी सन्मान करावा असा नियम केला. शिवाजी महाराजांचे चरित्र प्रत्येकाला जीवन जगताना मोठी स्फूर्ती देत असून योग्य मार्ग दाखवत असल्याचे शिवव्याख्याते आप्पासाहेब गायकवाड यांनी केले
संगमनेर तालुक्यातील पिंपरणे येथे छत्रपती शिवाजी चौकात शिवजयंती मोठ्या उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाली यावेळी ते बोलत होते
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवराम वाकचौरे हे होते
तसेच यावेळी सरपंच नारायण मरभळ उपसरपंच मिनीनाथ जोर्वेकर काकासाहेब गायकवाड गगनगिरी विद्यालयाचे प्राचार्य रमेश वाळे सर जिल्हा परिषद मुख्याध्यापक संजय बोरसे कविता देशमुख मॅडम अरुणसाहेब देशमुख गंगाराम वाकचौरे उमाजी जोर्वेकर दूध संघ संचालक रवींद्र रोहम राजेंद्र देशमुख अजित मांडे उत्तमनाना राहिंज बाबासाहेब राहिंजसर रामराव देशमुख विनोद साळवे बाळासाहेब कर्पे सर नवनीत देशमुख बाळासाहेब निकम निलेश चत्तर पोपट साळवे आदिसह ग्रामस्थ मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते
यावेळी पाहुण्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले त्यानंतर दीपप्रज्वलन करून महाराजांची आरती घेण्यात आली
परमपूज्य गगनगिरी महाराज विद्यालय व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज मा जिजाऊ संभाजी महाराज शाहू महाराज संत गाडगे महाराज संत तुकाराम महाराज सावित्रीबाई फुले राम लक्ष्मण सीता हिरकणी माता रमाई अहिल्याबाई होळकर महात्मा फुले शिवबाचे मावळे तानाजी मालुसरे बाजीप्रभू देशपांडे यांची वेशभूषा करत मिरवणुकीत रंगत आणली
यावेळी डीजे किंवा कोणतेही वाद्य न वाजवता छत्रपती शिवरायांच्या नावाचा जयघोषकत गावातून मिरवणूक काढण्यात आली

गायकवाड पुढे म्हणाले की, बलाढ्य शक्ती विरुद्ध लढताना स्वराज्यातील गोरगरिबांच्या हिताचे रक्षण केले. त्यांचा वारसा घेऊन प्रत्येकाने काम केले पाहिजे. आंतरराष्ट्रीय पातळीवर छत्रपती शिवाजी महाराज यांचे चरित्र अभ्यासले जात असून ते सर्वांसाठी स्फूर्तीदायी आहे. त्याचा अभिमान प्रत्येकाने बाळगले पाहिजे.
कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांनी विविध वेशभूषा केल्या होत्या त्याची वेशभूषा स्पर्धा घेण्यात आली त्या स्पर्धेचे विजेते निवडण्यात आले विजेत्या विद्यार्थ्यांना रोख रकमेसह ट्रॉफी आणि पुस्तक भेट देण्यात आली
या कार्यक्रमासाठी शिवजयंती उत्सव समितीतील किशोर जोर्वेकर संजय बागुल निलेश बागुल राहुल निकम संदीप ठोंबरे राहुल बागुल संजय देशमुख सुधीर रोहम सनी राहींज पोपट साळवे संचित भारती गोकुळ ठोंबरे प्रसाद मांडे प्रदीप मांडे योगेश ठोंबरे अनिल ठोंबरे सतीश ठोंबरे प्रल्हाद ठोंबरे संतोष वर्पे चेतन पवार आदित्य मांडे यांच्यासह शिवजयंती उत्सव समिती परमपूज्य गगनगिरी महाराज विद्यालय जिल्हा परिषद शाळा पिंपरणे ग्रामस्थ यांनी मोलाचे परिश्रम घेतले
कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपसरपंच मिनीनाथ जोर्वेकर यांनी केले सूत्रसंचालन संजय बागुल व निलेश बागुल यांनी केले
