विखेंनी केलेल्या भूमिपूजनाला संगमनेरकरांचा तीव्र विरोध

स्थानिक आंदोलकांना पोलिसांच्या गराड्यात रोखले

संगमनेर मध्ये संतापाची लाट

संगमनेर / लोकवेध live न्यूज 

म्हाळुंगी नदीवर होत असलेल्या पुलाचे भूमिपूजन मंत्री विखे यांच्या हस्ते होऊ नये याकरता संगमनेर मधील स्थानिक रहिवाशांनी मोठा विरोध केला असून हा विरोध रोखण्याकरता पोलीस व प्रशासनाने अनेक स्थानिक रहिवाशांना रोखल्याने संगमनेर मध्ये संतापाची लाट निर्माण झाली असून मंत्री विखे व सत्ताधारी भाजपचे कार्यकर्ते यांना नामुष्की पत्करावी लागली.

ऑक्टोबर 22 मध्ये म्हाळुंगी नदीला आलेल्या पुरामुळे हा पूल खचला होता. यानंतर तातडीने काँग्रेस पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक रहिवाशांना ये-जा करण्यासाठी व्यवस्था करण्यात आली होती. याचबरोबर आमदार थोरात यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे या पुलाच्या निधी करता साडेचार कोटी रुपयांची मागणी केली आणि तो निधी मंजूरही झाला होता. मात्र पुलाचे राजकारण करण्यासाठी भाजपाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी महसूल मंत्री विखे यांच्या मार्फत निधी अडवून नागरिकांना वेठीस धरले.

मागील अडीच वर्षापासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नसल्याने नगर परिषदेवर प्रशासक आहे. आणि प्रशासक हे पालकमंत्री विखे यांच्या नियंत्रणाखाली आहे. या कामाचे वर्क ऑर्डर ला सुद्धा स्टे देण्यासाठी प्रयत्न झाला आहे.

हा पूल तातडीने व्हावा या करता स्थानिक नागरिकांनी मागील एक महिन्यापासून आंदोलन सुरू केले. अनेक वेळा मोर्चा काढून निवेदने दिली. मात्र हा पूल अडवून धरण्याचे कारण नागरिकांच्या एक-दोन दिवसांपूर्वी लक्षात आले. भाजप नेत्यांना याचे श्रेय घ्यायचे आहे हे ओळखून स्थानिकांनी याला विरोध केला. त्यामुळे पोलीस प्रशासनाने उपोषण करत असलेल्या कार्यकर्त्यांना तेथून हटवले .तरीही भूमिपूजनाच्या वेळेस अनेक स्थानिक महिला त्या ठिकाणी आल्या. सर्व स्थानिक महिला व कार्यकर्ते यांनी पोलिसांच्या गराड्यात रोखून धरले .हे कार्यकर्ते मंत्री विखे यांना निवेदन देण्याकरता जाणार होते. आंदोलन करणाऱ्यांना भूमिपूजनासाठी का बोलावले नाही असा सवाल विचारणार होते. मात्र प्रशासनाने त्यांचे न ऐकता त्यांना अडवून ठेवले. यामुळे संगमनेर मध्ये संतापाची लाट पसरली.

महिला व स्थानिक कार्यकर्त्यांना रोखून धरल्याची बातमी पसरतात मंत्री विखे व भाजप कार्यकर्त्यांना कार्यक्रम आटोपता घेण्याची नामुष्की पत्करावी लागली.

यावेळी अमोल डुकरे म्हणाले की, ऑक्टोबर 22 मध्ये पूल खासल्यानंतर एकदाही विखे पाटील या ठिकाणी आले नाही. त्यांना पुलाच्या बाबत काहीही माहिती नाही .आणि आज अचानक पुलाला येऊन नाव देण्याचे केलेले कुटील कारस्थान हे न समजण्यासारखे आहे .याचा आम्ही तीव्र निषेध करत आहोत. हा सत्तेचा गैरवापर असून ही झुंडशाही आम्ही चालू देणार नाही असा इशाराही त्यांनी दिला.

तर किरण पाटणकर म्हणाले की, ज्यांचा संबंध नाही हे लोक या ठिकाणी आले आहेत .आम्ही एक महिन्यापासून आंदोलन करत आहोत त्यावेळेस एकही भाजपचा पदाधिकारी इकडे फिरकला नाही. आणि आता त्यांना काय पुळका आला. आम्हालाही भूमिपूजन मान्य नाही आम्ही या फुलाचे नामकरण खोडून काढणार आहोत असा इशाराही त्यांनी दिला

तर  बंटी पवार, बंडू माळस ,राकेश परदेशी, संकेत पाटणकर, कैलास साळुंखे, यांनीही आपल्या तीव्र प्रतिक्रिया नोंदवल्या.

या घटनेमुळे साईनगर, पंपिंग स्टेशन, घोडेकर मळा, रंगार गल्ली यांसह संपूर्ण संगमनेर शहरात न केलेल्या कामाचे श्रेय लाटणाऱ्या भाजपाचे नेते व स्थानिक कार्यकर्ते यांच्या विरोधात संतापाची लाट निर्माण झाली आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!