पंचवीस वर्षात सात वेळा कोलाट उड्या मारणाऱ्यांनी आम्हाला निष्ठा शिकू नये – आ थोरात
संगमनेर / लोकवेध live न्यूज
राज्य सरकार हे सर्वसामान्य , गोरगरिब , कष्टकरी , मागसवर्गिय , महिला , बेरोजगार तरुणांचे सरकार नसून मुठभर भाडवंलदारांचे सरकार असून यांना शेतकऱ्यांचे , महिलाचे अथवा मराठा आरक्षण मोर्चासह विविध आंदोलकांचे प्रश्नचं समजेना हे तिनजणाचे सरकार दिशाहिन झाल्यानेचं आता मतदारांचं त्यांची जागा दाखवेल असे परखड मत काग्रेस पक्षाचे गटनेते आ बाळासाहेब थोरात यांनी मांडले .
संगमनेर तालुक्यातील देवगड येथे यात्रानिमित्ताने आ . थोरात पत्रकारांशी बोलत होते . यावेळी केंद्रासह राज्यात व संगमनेरातील विविध विषयावर ते सविस्तरपणे बोलले .
आ बाळासाहेब थोरात पुढे म्हणाले की केद्र सरकारच्या गोरगरिब , कष्टकरी , गरिब माणसासह शेतकऱ्यांबाबत चुकी धोरणं घेत असून हे केवळ मुठभर लोकांच्या फायदा निर्णय घेत आहे . यांना
शेतकऱ्यांच्या असणाऱ्या मागण्या काय ? कळणार म्हणूचं ते शेतकरांचे आंदोलन दडपण्याचे काम करतात त्यांतून निष्पाप शेतकऱ्यांचे बळी जातात त्यांचे त्यांना काहीचं घेणे देणे नाही त्यामुळेचं राहुल गांधीच्या बरोबर हजारो लोक भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून जोडले जात असून आपले यातना सांगत आहे तर कॉग्रेस पक्षाला चांगले दिवस येणार आहे .
थोरात पुढे म्हणाले की , राज्यातील वाळूचे नवे धोरण पूर्णपणे सपशेल फसवे धोरण ठरलं आहे अनेक ठिकाणी वाळू माफिया मनमानी व दडपशाही पद्धतीने वाळू उपसा करून तिची अतिशय उच्च दराने विक्री होत आहे याला पुर्णपणे शासनाचे संरक्षण मिळत आहे ही मोठी दुर्दैवी बाब असून शासन केवळ बघायची भूमिका घेत आहे तर ऐकीकडे शासनाचे निवारा धोरण सुरु असून दुसरीकडे ज्यांना निवाराची गरज आहे म्हणजे सर्वसामान्य , मध्यमवर्गिय , गोर गरिबांना घर बांधण्याकरिता वाळूचं मिळत नसल्याची खेंदाची गोष्ट आहे .
लोकसभेचे जागा वाटपाबाबत ४८ जागे बाबत एक मत झाले मात्र पाच ते सात जागेवरील मत भिन्नता असल्याने प्रत्येकांनी या जागेवर दावा केल्याने आता २७ मार्चला इंडिया आघाडीचे व महाविकास आघाडीची बैठक होणार असून हा सुद्धा तिढा बैठकीच्या माध्यमातून सोडवला जाईल तसेच शिर्डीमध्ये काँग्रेस पक्षाची ताकद मोठी असल्याने या जागेवर पक्षाने दावा केला असून ही जागा काँग्रेस पक्षालाचं मिळविण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत मात्र येथील निवडून येणार उमेदवार हा महाविकास आघाडीचाचं असेल असा विश्वास थोरातांनी व्यक्त केला तर भाजपाचे पालकमंत्री हे संगमनेरमध्ये येऊन दडपशाहीचे राजकारण करत असून कुठल्याही विकास कामाच्या शुभारंभाकरिता दबाब आणत माझी परवानगी शिवाय काम सुरु करु नये हे धोरण वापरत आहे संगमनेर हे अशी घुसखोरी प्रथमचं पाहत असून संगमनेकरांना शांतता व प्रेमाच्या सवयी आहे .अशा अशुद्ध निर्माण होणार्या वातावरणामुळे अशांतता निर्माण झाल्याची खेतजनक गोष्ट असून थोरात म्हणाले की ज्यांनी २५ वर्षात ७ वेळा उड्या मारल्या त्याच्याबद्दल काय ? बोलायचे .
चौकट
१ ) कांदा उत्पादक शेतकरी अत्यंत काबड कष्टातून मोठया अडचणी दूर करत आपले पिंक उभे करतो त्या शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळण्याचा प्रयोग होत आहे . कांदा बंदी उठवण्याबाबत पुरावा आधीचं जर सत्कार सोहळा होत असले तर ही शेतकऱ्यांची फसवणूकचं आहे .
२ ) राज्य सरकार हे मराठा समाज व जरांगे यांची आरक्षणावरुन दिशाभूल करत आहे . जर तेव्हाचं गुलाल उधाळला मग पुढे झाले काय ? हे न समजणारे कोडे आहे . सरकारनी भूमिका स्पष्ट करावी .
आ बाळासाहेब थोरात
