*अंधश्रद्धांना फाटा देत निर्व्यसनी राहून संत रविदासांचा विचार आचरणात आणा-कवी सुभाष सोनवणे*
*राज्यस्तरीय वधू-वर सूचक मेळावा व रक्तदान शिबिर संपन्न*
संगमनेर / लोकवेध live न्यूज
प्रचंड संघर्षमय जीवन जगत अंधश्रद्धा व कर्मकांड यांना थारा न देणारे विज्ञानवादी-समतावादी विचारवंत म्हणजे संत शिरोमणी रविदास महाराज होते. समाज बांधवांनी अंधश्रद्धा न बाळगता व्यसनमुक्त राहून संत रविदास यांच्या विचारांचे आचरण करावे.. असे विचार कार्यक्रमाचे अध्यक्ष थोर साहित्यिक कवी सुभाष सोनवणे यांनी व्यक्त केले.
संगमनेर मध्ये नुकतीच चर्मकार विकास संघ यांच्या वतीने संत रविदास यांची 647 वी जयंती विविध उपक्रमांनी संपन्न झाली यावेळी मा. नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, सिने अभिनेते काळूराम ढोबळे, जिल्हाध्यक्ष संतोष कानडे, एड आदिनाथ बाचकर, समाजसेवक बाबा खरात, नगरसेवक राजेंद्र वाकचौरे, प्रशासन अधिकारी प्रल्हाद देवरे, संगीता वाकचौरे, ज्ञानेश्वर राक्षे, आदित्य घाडगे, सोमनाथ मदने आदि. मान्यवर उपस्थित होते.
मा.नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे यांनी सांगितले की वधू-वर मेळाव्यात पालकांनी समजदार, निर्व्यसनी व कर्तबगार मुला- मुलींना प्राधान्य देत साध्या पद्धतीने विवाह संपन्न करावा असे आवाहन केले.
समाजसेवक बाबा खरात यांनी सांगितले की,जातीपातीच्या भिंती पाडून संत रविदास यांनी सांगितलेला संविधान- समता, बंधुतेचा विचार अनुसरत आनंदी जीवन जगावे.
यावेळी चर्मकार विकास संघाचे जिल्हाध्यक्ष संतोष कानडे, सामाजिक कार्यकर्ते अर्जुन वाघ, सिने अभिनेते काळूराम ढोबळे यांनी आपले विचार व्यक्त केले.
श्री संत शिरोमणी रविदास महाराज यांच्या जयंती उत्सवाच्या निमित्ताने सकाळी संगमनेरमध्ये भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात अनेक तरुणांनी रक्तदान करून संत रविदास यांना अभिवादन केले.
याप्रसंगी आयोजित केलेल्या राज्यस्तरीय मोफत वधु-वर पालक परिचय मेळाव्यासाठी चांगला प्रतिसाद मिळाला.
स्वर्गवासी कुसुम वाकचौरे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ प्रथितयश व्यापारी अशोक नारायण वाकचौरे यांनी महाप्रसाद (जेवण) दिल्याबद्दल वाकचौरे परिवाराचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी नाशिक येथील मनिषा वाघ मॅडम यांना चर्मकार विकास संघाच्या वतीने पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी के. एस देव्हारे,भाऊसाहेब सोनवणे, लक्ष्मण वाघ, प्राचार्य कारभारी वाकचौरे, केंद्रप्रमुख यशवंत आंबेडकर, सिताराम बो-हाडे, अशोक बो-हाडे, गोरक्षनाथ कांबळे, विनायक वाकचौरे, मनोज वाकचौरे, अनिल वाकचौरे, भास्कर थोरात, उषा कांबळे, साधना बो-हाडे,तुषार बो-हाडे यांनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक वधू-वर सूचक मंडळाचे राज्यध्यक्ष रामदास सोनवणे यांनी केले.
यावेळी राज्यभरातील मोठ्या प्रमाणात समाज बांधव कार्यक्रमासाठी, वधू-वर परिचय मेळाव्यासाठी उपस्थित होते.
सूत्रसंचालन बाळासाहेब वाघ, प्रदीप कांबळे यांनी केले तर आभार राजेंद्र कांबळे यांनी मानले.
