आदिवासी उपयोजन क्षेत्रातील शिक्षकांचे प्रश्न सोडवा- प्रा.महेश पाडेकर

शिक्षण मंत्र्यांच्या स्वीय सहाय्यक डॉ.अमोल भोर यांना निवेदन.

राजूर / लोकवेध live न्यूज

महाराष्ट्र राज्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांचे मंत्रालयीन (ओ.एस.डी.)स्वीय सहाय्यक डॉ.अमोल भोर यांना आदिवासी उपयोजना क्षेत्रातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांसंदर्भात शिक्षक भारती संघटना अहमदनगर यांच्यावतीने निवेदन देण्यात आले.सदर निवेदनाद्वारे आदिवासी उपयोजन क्षेत्रातील शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी जिल्हा सरचिटणीस प्रा.महेश पाडेकर,मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष सुनिल धुमाळ यांसह तालुक्यातील मुख्याध्यापक तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आदींनी अव्हान करण्यात आले आहे. निवेदनात आदिवासी उपयोजना क्षेत्रातील एकस्तर वेतन श्रेणी, प्लॅन टू नॉनप्लॅन, शालार्थ, १००टक्के प्रचलित पद्धतीने अनुदान,जुनी पेन्शन योजना, विनाअनुदानित ते अनुदानित बदली मान्यता, अर्धवेळ ते पूर्ण वेळ मान्यता, संचमान्यता विद्यार्थी निकष शिथिल करणे, प्रलंबित थकीतदेयके, वैद्यकीय देयके, वेतन निश्चिती, आदी प्रलंबित विषयांवर सखोल चर्चा होऊन महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना निवेदन देऊन आदिवासी उपयोजना क्षेत्रातील शिक्षकांचे प्रश्न तातडीने सोडवा. अशी मागणी करण्यात आली आहे.या सततच्या भेडसावणाऱ्या प्रश्नांमुळे अध्ययन व अध्यापन प्रक्रिया डळमळीत होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.तसेच शिक्षक मानसिक दृष्ट्या योग्य नसेल तर राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० यामध्ये कृती संशोधन नवोपक्रमानुसार शिक्षकांच्या क्षमता वृद्धीद्वारे भारत ज्ञान महासत्ता बनण्यास कितपत सक्षम होऊ शकेल यावरही प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकते. त्यामुळे वरील प्रश्न तातडीने सोडवणे गरजेचे असल्याचे मत शिक्षक भारती संघटनेचे जिल्हा सरचिटणीस प्रा.महेश पाडेकर यांसह तालुक्यातील शिक्षक बांधवांनी व्यक्त केले आहे. वरील असणारे प्रश्न सोडवले जातील असे सकारात्मक आश्वासन डॉ. अमोल भोर यांनी दिले. याप्रसंगी शिक्षक भारती संघटनेचे जिल्हा सरचिटणीस प्रा. महेश पाडेकर,सल्लागार प्रा.सचिन लगड, शिक्षक भारती संघटनेचे तालुका उपाध्यक्ष राजेंद्र जाधव,आदिवासी उपयोजन क्षेत्रातील जिल्हाध्यक्ष संजय जाधव,विजय पांडे, प्रवीण मालुंजकर, भरत भदाणे,दीपक पाचपुते, संजय व्यवहारे, रमेश आरोटे, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष सुनील धुमाळ, माध्यमिक सोसायटी संचालक अण्णासाहेब ढगे,मुख्याध्यापक मधुकर मोखरे, महेश दिंडे,श्रीमती काळे, प्रा.दिपक बुऱ्हाडे आदीसह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!