नाशिक फोटोग्राफर्स व व्हिडीओग्राफर्स असोसिएशन च्या वतीने ६४ महिलांचा सत्कार…
महिलांचा लक्षणीय सहभाग..
नाशिक : लोकवेध live न्यूज / निलेश शेकोकार
जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने नाशिक मधील एकूण ६४ महिलांचा सत्कार व सन्मान , सन्मान पत्र व क्राऊन व श्रीरामाची प्रतिमा देऊन नुकताच संपन्न झाला यात छायाचित्रकार महिला, फोटो व व्हिडीओ एडिटर, अल्बम डिझायनर तसेच या क्षेत्रात छायाचित्रकारांना मदत करणाऱ्या ४२ महिला छायाचित्रकार तसेच ज्या छायाचित्रकारांच्या मुलींनी विविध क्षेत्रात उच्च शिक्षण घेऊन विशेष प्राविण्य व नावलौकिक मिळविले आहे अश्या २२ एकुण ६४ महिलांचा सत्कार व सन्मान नाशिक फोटोग्राफर्स व व्हिडीओग्राफर्स असोसिएशन च्या वतीने मुंबई येथील प्रसिद्ध महिला छायाचित्रकार प्रमुख पाहुण्या मा. वीणा गोखले यांच्या शुभहस्ते करण्यात आला…
वीणा गोखले या प्रसिद्ध छायाचित्रकार म्हणून मागील ३५ वर्षांपासून मुंबई येथे छायाचित्रकार म्हणून कार्यरत आहेत त्यांनी छायाचित्रण क्षेत्रातील त्यांचा प्रवास व गौतम राजाध्यक्ष यांच्या सोबत काम करण्याची संधी मिळाल्याचे यावेळेस सांगितले छायाचित्रण विषयावर उपस्थित महिलांशी सुसंवाद साधून आपला अनुभव व काही टिप्स व ट्रिक समाजून सांगितल्या सचिन तेंडुलकर, माधुरी दीक्षित, नितीन गडकरी अश्या अनेक मान्यवरांच्या छबी त्यांनी आपल्या कॅमेर्यात कैद केल्या आहेत नाशिक फोटोग्राफर्स व व्हिडीओग्राफर्स असोसिएशनचे कार्य व आज एवढ्या मोठ्या प्रमाणावर महिला छायाचित्रकारांची उपस्थिती मी पहिल्यांदाच पाहते तसेच गेल्या २० वर्षापासून असोसिएशन छायाचित्रकारांन साठी विविध उपक्रम राबत आहे याचा मनापासून आनंद वाटतो नाशिक मधील महिला छायाचित्रकारांन साठी लवकरच माझे एक वर्कशॉप मी नाशिक मध्ये आयोजित करेल असे गौरवोद्गार त्यांनी काढले नाशिक फोटोग्राफर्स व व्हिडीओग्राफर्स असोसिएशन च्या वतीने गोदाघाटाची प्रेम सन्मान पत्र व श्रीरामाची प्रतिमा देऊन पदाधिकारी व कमिटी मेंबर्स च्या वतीने मा. वीणा गोखले यांचा सन्मान करण्यात आला
पंडित कॉलनी येथील लायन्स क्लब सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ज्या छायाचित्रकारांच्या मुलींनी विविध क्षेत्रात उच्च शिक्षण घेऊन विशेष प्राविण्य व नावलौकिक मिळविले आहे त्यांनी देखील त्यांचे अनुभव कथन केले..
सभासद कोमल साळुंखे यांनी असोसिएशन चे कार्य व काम तसेच एवढ्या मोठ्या प्रमाणात आज महिला या क्षेत्रात एकत्र येऊन काम करताय आज जो आमचा सन्मान होतोय त्याबद्दल सर्व पदाधिकारी व कमिटी मेंबर्स चे अभिनंदन कौतुक करून आभार मानले
याप्रसंगी व्यासपीठावर नाशिक फोटोग्राफर्स व व्हिडीओग्राफर्स असोसिएशन चे अध्यक्ष संजय जगताप सेक्रेटरी नंदू विसपुते, कमिटी मेंबर्स – प्रताप पाटील, प्रशांत तांबट, राजू नाकील, विवेक नाईक , किरण मुर्तडक, सौरभ अमृतकर, रविंद्र गवारे, कैलास निरगुडे, विलास आहिरे, संदिप भालेराव, सुनिल जगताप , आदि उपस्थित होते ..
नाशिक मध्ये फोटोग्राफी क्षेत्रातील महिलाचा सत्कार व सन्मान सोहळा मोठ्या प्रमाणावर होतोय याच कौतुक सर्व महिला करत होत्या तसेच सर्व महिलांन मध्ये उत्साहाच वातावरण होत नाशिक मधील प्रसिद्ध व संघटनेच्या कार्यात नेहमीच सहभागी होणारे सोफाईन कलर लॅब चे विक्रांत सोनवणे ,नाईस डिजीटल चे संजय चौधरी, फोटोलाईटचे संतोष लाले, किरण तांबट, किरण टाक, योगेश जैन, विजय शिंपी, आनंता बोढरे, श्रीश वाडेकर आदि उपस्थित होते..
कार्यक्रम यशस्वीते साठी सर्व कमिटी मेंबर्स ने परिश्रम घेतले तर अध्यक्ष संजय जगताप यांनी सर्वाचे स्वागत करून नाशिक मध्ये लवकरच संघटनेच्या वतीने महिला छायाचित्रकारांनसाठी मॅटरनिटी व बेबी शूट वर्कशॉप चे आयोजन करण्यात येणार असल्याचे सांगितले नंदु विसपुते यांनी सूत्रसंचालन केले..
