पिंपरणे ग्रामपंचायतच्या वतीने विविध विकास कामांचा भूमिपूजन कार्यक्रम संपन्न
संगमनेर / लोकवेध live न्यूज
संगमनेर तालुक्यातील पिंपरणे येथे ग्रामपंचायत वतीने पंधरावा वित्तआयोग निधी व अटल भूजल योजने अंतर्गत विविध कामाचा भूमिपूजन समारंभ पार पडला
ग्रामपंचायतच्या वतीने विविध विकास कामे सुरू असून यावेळी बंदिस्त गटार, भीमनगर समाज मंदिर परिसर शुभिकरण करणे, स्मशानभूमी बांधकाम व देखभाल दुरुस्ती करणे तसेच अटलभूजल योजनेअंतर्गत खुळे वस्ती शेजारी माती बंधारा, चंद्रकांत ठोंबरे वस्ती शेजारी माती बंधारा,अनिल सरोदे वस्ती शेजारी माती बंधारा आदी ठिकाणी विकास कामांचे भूमिपूजन संपन्न झालेयावेळी दुध संघाचे संचालक रवी रोहम, शेतकी संघाचे संचालक संजय खरात, सरपंच नारायण मरभळ उपसरपंच मिनीनाथ जोर्वेकर, शिवराम वाकचौरे, काकासाहेब गायकवाड,राजेंद्र देशमुख, निलेश बागुल, उत्तमनाना राहींज, धनंजय वाकचौरे, मंजाबापू साळवे, संजय बागुल, निलेश चत्तर, इंजिनीयर सचिन जोर्वेकर, राहुल निकम,पोपट साळवे,साहेबराव बागुल, ग्रामसेवक अशोक कुदळ, शैला साळवे कोमल मरभळ,कल्याण जोर्वेकर, यावेळी कार्यक्रमासाठी नितीन बागुल सुरेश साळवे प्रदीप मांडे यांनी परिश्रम घेतले
