गॉडस् असेंबल मिनिस्ट्री संस्थेच्या वतीने जागतिक महिला दिन निमित्ताने महिलांना व्यावसायिक प्रशिक्षण
पिंपरणे / लोकवेध live न्यूज
संगमनेर तालुक्यातील कनोली येथील गॉडस् असेंबल मिनिस्ट्री संस्थेच्या वतीने पिंपरणे येथे जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला यावेळी महिला दिनानिमित्त महिला सक्षम व्हावी यासाठी महिलांना व्यावसायिक प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न झाला महिलांना रोजच्या वापरातील फिनेल, वॉशिंग पावडर, भांडी धुण्याचे लिक्वीड घरगुती बनवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले . यावेळी संस्थेच्या अध्यक्षा मा उज्ज्वला जगताप यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले, एक शिक्षित महिला घरादाराला पुढे नेई यासाठी एक महिला कशा पद्धतीने घर सावरते, कुटुंबातील महिलांचे महत्व , मुलांवरील घरातील संस्कार मुलांना वाईट सवयी पासून वाचवू शकते, आज मुलाकडे लक्ष दिले तर एक चांगली पिढी आपल्या हातून घडेल अशा प्रतिपादन केले अनोख्या पद्धतीने जागतिक महिला दीन साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमास प्रशिक्षक विशाल पंडित सर (नगर), प्रमुख उपस्थिती मच्छिंद्र जगताप सर (सामाजिक कार्यकर्ते). पिंपरणे ग्रामपंचायत सदस्य अर्चना रोहम यांनी आपल्या भागात या अनोख्या उपक्रमाचे स्वागत केले उपस्थितांचे आभार मानले, यावेळी शंभराहून अधिक महिला होत्या. निलेश रोहम यांच्या वस्तीवर मोठ्या उत्साहात हा महिला दिन पार पडला.
