हिंदुत्ववादी संघटनेच्या मागण्यांवर प्रशासन ॲक्शन मोडवर – प्रांताधिकारी शैलेश हिंगे
हिंदुत्ववादी संघटनांना शांततेचे आवाहन
संगमनेर / लोकवेध live न्यूज
हिंदू संघटनांच्या मागण्यांवर प्रशासन ॲक्शन मोडवर असून शंभर टक्के मागण्या पूर्ण होणार असल्याची माहिती प्रांताधिकारी शैलेश हिंगे, डिवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांनी दिले
ग्रामिण भागातील जोर्वे, कोल्हेवाडी, निबांळे, सुकेवाडी, समनापुर, तळेगाव निळवंडे, वडगाव पान, कोकणगाव, रहीमपुर, ओझर, उंबरी, मनोली, खराडी, रायते, वाघापुर, पिंपरणे जाखुरी हंगेवाडी कनोली आदी गावांची प्रांत कार्यालयात बैठक संपन्न झाली जोर्वे चे सरपंच गोकुळ दिघे राहुल दिघे सतीश वाघ,सतीश वाळुंज, श्रीनाथ थोरात, शिवाजीबाबा आहेर, भाऊसाहेब पवार,भाऊपाटील वर्पे शैलेश वाघ सचिन शिंदे स्वानंद चत्तर, संतोष कुटे संतोष भुजबळ आदी उपस्थित होते या बैठकीत
संगमनेर बस स्थानक येथे झालेल्या हाणामारीत काही हिंदुत्ववादी संघटणेच्या युवकांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले ते त्वरीत मागे घेउन खोटे गुन्हे दाखल करणाऱ्यांची चौकशी करुण कार्यवाही व्हावी.
दिल्ली नाका ते संगमनेर खुर्द (पुणे नासिक महामार्ग), दिल्ली नाका ते संगमनेर पंचायत समिती, कोल्हेवाडी रोड, जोर्वे नाका ते सेंट मेरी चर्च (फादरवाडी) येथील अतिक्रमणे त्वरीत काढणेत यावी.
जोर्वेनाका, दिल्ली नाका, बसस्टँड येथे सीसीटीव्ही कॅमेरे बसवावे दिल्ली नाका येथे पोलिस चौकी उभारून सदर ठिकाणी कॉन्टेबल उपस्थीत ठेवावे. जोर्वे नाका येथील पोलिस चौकीत 24 तास पोलिस कॉन्टेबल उपस्थीत असावे
विना परवाना रिक्षा व वाहनांवर आरटीओ मार्फत चौकशी करुन कार्यवाही करावी.
हाँटेल्स व अस्थापना यांचेवर रात्रीचे वेळेचे बंधन ठेवणेत यावे.
शहरामध्ये ठिक ठिकाणी मोठया प्रमाणात विनाकरण जमा होणाऱ्या टोळक्यांवर कार्यवा
करावी.
निबांळे, जोर्वे, रहीमपुर, कोल्हेवाडी येथील विदयार्थी, विदयार्थीनींना, जेष्ठ नागरीकांन संगमनेर येथे जाणे येण्यासाठी एसटी बस सुरु करावी.
हल्ले खोरांना अटक करुण त्यांचेवर तातडीने कार्यवाही करावी.
सदर मागण्या मांडण्यात आल्या यावेळी कायदेशीर बाबी पाळुन सर्व मागण्या मान्य केल्या तसेच निवडणुक आचारसंहिता नंतर अतिक्रमण धारकांवर कारवाई केली जाईल असे आश्वासन दिले
मागण्या मान्य न झाल्यास जन आक्रोश मोर्चा – सरपंच गोकुळ दिघे
सदर सर्व मागन्या मान्य न झाल्यास न भुतो न भविष्य असा भव्य भगवा जनआक्रोश मोर्चा काढुन सर्व शासकिय कार्यालयांना घेराव घातला जाईल व होणाऱ्या परीनामास सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील असे प्रतिपादन सरपंच गोकुळ दिघे यांनी केले तसेच सर्व हिंदू बांधवांनी आचारसंहिता संपेपर्यंत शांतता पाळावी ही विनंती केली
