मा. रणजितसिंह देशमुख यांच्या शुभहस्ते  श्रीक्षेत्र  बुवाजीबाबा डिग्रस ते श्रीक्षेत्र  बाबीर देवस्थान पायी दिंडी सोहळ्याचे पूजन 

संगमनेर / लोकवेध live न्यूज 

संगमनेर तालुक्यातील डिग्रस येथील श्रीक्षेत्र  बुवाजीबाबा  ते श्रीक्षेत्र  बाबीर देवस्थान पायी दिंडी सोहळ्याचे सालाबाद प्रमाणे याही वर्षी आयोजन करण्यात आले या दिंडी पायी सोहळ्याचे हे 35 व्या वर्षी असून अतिशय शिस्तबद्ध दिंडी म्हणून नावलौकिक आहे महंत बुवाजी बाबा पुणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा दिंडी सोहळा सुरू आहे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले बाबीर देवस्थान रुई या ठिकाणी ही दिंडी जाते

असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र बुवाजी बाबा देवस्थान डिग्रस ता. संगमनेर ते श्री क्षेत्र बाबीर देवस्थान  रुई ता. इंदापूर येथे जाणाऱ्या पायी दिंडीच्या रथाचे पूजन राजहंस दुध संघाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख व युवक काँग्रेसच्या अध्यक्षा डॉ. जयश्रीताई थोरात यांच्या हस्ते आज डिग्रस येथे करण्यात आले.

यावेळी त्यांनी भक्तीमय वातावरणात संवाद साधून पायी दिंडीतील भाविक-भक्तांना शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी देवस्थानचे अध्यक्ष महंत बुवाजी बाबा पुणेकर, महंत उमाजीतात्या पुणेकर , जानकीराम पुणेकर , भिकाजी पुणेकर तसेच नाशिक, मुबंई व पंचक्रोशीतील असंख्य भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!