पद्मश्री कर्मवीर खासदार दादासाहेब गायकवाड यांचे नातू श्री किरणआप्पा वसंतराव गायकवाड यांचा सेवापूर्ती व अभिष्टचिंतन सोहळा संपन्न
नाशिक / लोकवेध live न्यूज / निलेश शेकोकार
विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे उजव्या हात भूमिनांचे कैवारी पद्मश्री कर्मवीर खासदार दादासाहेब गायकवाड यांचे नातू श्री किरणआप्पा वसंतराव गायकवाड यांचा सेवापूर्ती व अभिष्टचिंतन सोहळ्याचा कार्यक्रम रविवार दिनांक 31 मार्च 2024 रोजी कर्मवीर दादासाहेब गायकवाड जन्मभूमी स्मारक येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते त्यांनी जलसंपदा विभाग नाशिक येथे 40 वर्ष अतिशय प्रामाणिकपणे सेवा केली आणि ते सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असून सध्या ते शेतकऱ्यांची आर्थिक वाहिनी असलेल्या विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे संचालक म्हणून काम पाहत आहेत यावेळी त्यांची राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाच्या समाजकार्य विभागाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली सदर निवडीचे पत्र राष्ट्रीय अध्यक्ष संतोष निकम यांनी दिले द्याप्रसंगी दिंडोरी तालुक्याचे माजी आमदार धनराज महाले मराठा विद्या प्रसारक संस्थेचे संचालक प्रवीण जाधव मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष गुड्डू सय्यद मोहाडी गावचे चेअरमन कैलास कळमकर संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचे माजी आमदार दादासाहेब रोहम यांचे चिरंजीव वसंतराव रोहम गावचे सरपंच मंगेश कराटे सदस्य मोतीराम पिंगळे रिपब्लिकन पक्षाचे उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष कैलासभाई पगारे जिल्हा उपाध्यक्ष रत्नकर पगारे सामाजिक कार्यकर्ते भास्करराव मालसाने विकास सोसायटीचे चेअरमन विलास शिंदे कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानिक सिन्नरचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक विश्वनाथ खरात होते याप्रसंगी अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले किरण आप्पा गायकवाड यांना केंद्रीय राज्यमंत्री रामदासजी आठवलेसाहेब,डॉ. भारतीताई पवार यांनी व विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ,फोन द्वारे शुभेच्छा दिल्या सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक सागर गायकवाड यांनी केले आभार अमित गायकवाड यांनी मानले सदर कार्यक्रमास परिसरातील नागरिकांच्या वतीने मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली होती
