संगमनेर मध्ये टेक्नोरबिट या क्लास अंतर्गत जागतिक महिला दिनानिमित्त टेक्निकल सखी हा अनोखा कार्यक्रम संपन्न.
टेक्नोरबिटच्या अमोल राहणे सर यांचे विचार आणि मार्गदर्शन
संगमनेर लोकवेध live न्यूज
आम्ही टेक्निकल संस्कार करतो ही टॅगलाईन असणाय्रा टेक्नोरबिटच्या अमोल राहणे सर यांच्या विचारातून आणि मार्गदर्शनाखाली टेक्नोरबिट च्या वतीने महिला दिनानिमित्त टेक्निकल सखी हा अनोखा कार्यक्रम संपन्न झाला
![]()
यावेळी कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे अमृतवाहिनी कॉलेजच्या विश्वस्त शरयुताई देशमुख, रूपालीताई औटी(माजी नगरसेविका) , अमोल सरांच्या मातोश्री नंदाताई राहणे आणि टेक्नोरबीटच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पूजा राहणे आदी उपस्थित होत्या.
यावेळी मुलींनी टेक्नीकल पोस्टर च्या माध्यमातून चित्रांचे सादरीकरण केले. या स्पर्धेत स्पर्धक विद्यार्थिनींनी जगात महिलांच्या विविध समस्या जसे की स्त्री भ्रूणहत्या, स्त्री सुरक्षा, स्त्री सबलीकरण, स्त्री -पुरूष समानता इ. विषयांवर टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून वेगवेगळ्या उपाययोजना सादर केल्या. यावर टेक्निकल सखी पोस्टरच्या माध्यमातून या स्पर्धेत टेक्नोरबीटच्या वतीने पुढील पारितोषिके देण्यात आले.
प्रथम पारितोषिक ७००० रुपये होते हे पारितोषिक अमृतवाहिनी कॉलेजच्या विद्यार्थिनी अनुष्का रोकडे, साक्षी बडाख, दिशा घुगे यांना मिळाले. द्वितीय पारितोषिक ५००० रुपये हे पारितोषिक अमृतवाहिनी कॉलेजच्या साक्षी दोंड, कीर्ती दिघे यांनी मिळवले. तृतीय पारितोषिक ३००० रुपये हे अमृतवाहिनी कॉलेजच्या कल्याणी मुलींटी, श्रावणी हीकरे, अनुजा पानसरे, चौथे पारितोषिक १००० रुपये ते पटकावले अमृतवाहिनी कॉलेजच्या साक्षी देशमुख, मयुरी देशमुख व पार्थ देशमुख यांनी तसेच चौथे पारितोषिक १००० रुपये संदीप फाऊंडेशनच्या शिवानी गुंजाळ, निकिता थोरात व ज्ञानेश्वरी हारदे यांना मिळाले. पाचवे पारितोषिक ५०० रू साक्षी गायकवाड यांना उत्तेजनार्थ देण्यात आले.
ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी टेक्नोरबीटच्या सर्वच विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी यांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद नोंदवला.
