डिग्रस येथील संघर्ष युवा मंडळाच्या वतीने भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

मोटर सायकल रॅली, सुंदर सजवलेला रथ, फटाक्यांची आतिषबाजी, भव्य दिव्य मिरवणूक,आरोग्य शिबिर जयंतीचे मुख्य आकर्षण ठरले 

पिंपरणे / लोकवेध live न्यूज
 संगमनेर तालुक्यातील डिग्रस येथील भालेराव वस्ती येथे संघर्ष तरुण मित्र मंडळाच्या वतीने महामानव भारत रत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंती निमित्त अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न झाला
यावेळी भन्ते करुणानंद बोधी  यांच्या शुभहस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पूजा व बुद्धवंदना करून करण्यात आली
यावेळी यावेळी प्रमुख उपस्थितीत विद्रोही साहित्य समिती सचिव  जालिंदर इघे साहेब, कॉम्रेड गंगाधर काकडे, शाखा अभियंता राजेंद्र पारखे साहेब,प्रकाश कदम, रोहित कदम, भंते करुणानंद बोधी,विश्वदीप वाघमारे, ऋतुजा अहिरे,  आदीसह डिग्रस मालुन्जे ग्रामस्थ ग्रामस्थ मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते
https://youtu.be/ejB5d840k5w?si=AqMaHmxnmFPiptcM
 यावेळी अतिशय सुंदर अशा रथातून तथागत गौतम बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली
रथाला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या आयुष्यातील काही प्रसंगाचे छायाचित्र डिजिटल बोर्ड लावुन रथयात्रेची सजावट केली होती हे मिरवणुकीचे खास आकर्षण ठरले आहे.
यावेळी लहान थोर महिला पुरुष यांनी नाचत बागडत भीम गीतांवर ठेका धरत  जयंती उत्सवाचा आनंद घेतला या मिरवणुकीत महिलाही मोठ्या उत्साहाने सहभागी होऊन भीम गीतांवर ठेका धरला होता.
अश्विन रुरल आयुवैद हॉस्पीटल व आरोग्यवर्धिनी केंद्र डिग्रस यांच्या संयुक्त विद्माने  जयंती निमित्त सर्व रोग निदान तपासणी शिबीर भालेराव वस्ती या ठिकाणी सपन्न झाले जयंती निमित्त शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले .
मिरवणूक नंतर प्रमुख पाहुण्यांचे मार्गदर्शन झाले यावेळी
जालिंदर इघे यांनी आपल्या भाषणात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दलित, बहुजन समाजाला जातीवाद, अस्पृश्यतेच्या जोखडातून मुक्त करून खरं स्वांतत्र्य मिळवून दिले, मनुस्मृतीच्या नियमांवर चालणारा देश संविधानाच्या चौकटीत एकसंघ बनविण्यासाठी अहोरात्र मेहनत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी घेतली म्हणून आज आपण व आपल्या घरातील महिला नोकरी करते, स्वाभिमानाने जीवन जगते असे प्रखरपणे मत व्यक्त केले.
विद्रोही साहित्य संमेलनाचे सचिव काॅम्रेड गंगाधर काकडे यांनी हे मुख्य व्याख्याते म्हणून खास निमंत्रित केले होते त्यांनी म्हटले आहे की हा देश अराजकतेकडे, हुकुमशाही कडे वाटचाल करत असताना आपण मात्र नाच गाण्यांवर दंग होत आहे, आपण डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना डोक्यात घेऊन नाचले पाहिजे, संविधान धोक्यात असताना आपण शांत बसून राहिलो तर पुन्हा गुलामगिरी चे आयुष्य जगावं लागेल असं प्रखर मत काकडे यांनी मांडले,
 डॉ बाबासाहेब आंबेडकर व भगवान गौतम बुद्ध यांचे विचार आपल्याला तारुण नेतील, आपला धर्म ग्रंथ कोणताही असु द्या मात्र संविधान हा आपला आद्य ग्रंथ असायला हवा असं रविंद्र पुणेकर यांनी सांगितले
 कार्यक्रमाच्या शेवटी भन्ते करूनानंद बोधी यांनी आशीर्वाद व मार्गदर्शन केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी  संघर्ष तरुण मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी
जयंती चे नियोजन यशस्वीरित्या पार पाडले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!