संगमनेरच्या चिमुकली ने मिळवली दाद ; यशस्वी जगताप ठरली पुरस्काराची मानकरी

संगमनेर / लोकवेध live न्यूज 

रसाळ ओघवती वाणीने समोरच्या प्रेक्षकांवर आपल्या नेत्रकटाक्षाच्या हावभावातून प्रभावशाली शब्द फेकीतून राहता येथील जिल्ज्ञास्तरीय
भाषण स्पर्धेत संगमनेरच्या चिमुकलीने आपल्या भाषणातून रसिक प्रेक्षकांनी दाद देत वाहवा मिळवली. औचित्य होते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंती
महोत्सव भाषणाचे. 14 एप्रिल रोजी राहता येथे जिल्हास्तरीय स्पर्धेचे आयोजनात इयत्ता नववी ते पदवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. आनंदवन विद्यालय घुलेवाडी ता संगमनेर इयत्ता पाचवीच्या यशस्वी ज्योती विकास जगताप हिने प्रथम क्रमांक पटकावून विशेष गुणवत्तेचे पारितोषिकही प्राप्त केले. यामध्ये तिला सन्मानपत्रा बरोबर रोख बक्षिस व खास शैलीतील प्रमाणपत्राने गौरविण्यात आले. मिळालेल्या यशाने भारावून न जाता यशस्वीने त्याचे श्रेय आपल्या आई वडिलांना दिले. यशस्वीचे सर्वांनी खूप कौतुक करून अभिनंदनही करीत तिला सदिच्छाही दिल्या. गुलामगिरीच्या जोखडातून मुक्त करून मानवाला मानवी हक्कांची जाणीव करून देत आपल्या अस्खखलित वाक्चातुर्यातून
अलौकिक प्रेरणादायी
शब्दप्रयोगाने जनसमुदायाला संबोधित करून जणू काही तिने अस्मितेची एक प्रकारे ज्योतच पेटवली. तिचे भाषण विद्यार्थ्यांना प्रेरणादायी ठरले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!