महामानव आंबेडकरांना आश्वीतील मुलींच्या लेझीम पथकाकडून अनोखी मानवंदना.

आश्वी / लोकवेध live न्यूज 

सुमारे महिनाभराच्या अथक परिश्रमातून महाराष्ट्राच्या मराठी लोकधारेचा अनोखा अविष्कार लेझीम नृत्यातून साकार करून महानायक आंबेडकरांना आश्वीत मानवंदना देण्यात आली.
भीमसैनिक व विविध क्षेत्रातील अनुयायी सकाळपासून बाबासाहेब आंबेडकरांना जयंती निमित्त अभिवादन करण्यासाठी उपस्थित होते.
ध्वजारोहण व वंदना सूत्रपठनाने कार्यक्रमाला सुरुवात होऊन अभिवादनानंतर उपस्थितांना मिठाईचे वाटप करण्यात आले.
सुमारे एक महिन्याचा महामानवाच्या विचारांचा जागर करण्याचा भरगच्च कार्यक्रम जयंती समितीच्या वतीने आखण्यात आला असून त्याचा आरंभ मोठया दिमाखदार सोहळ्यात करण्यात आला.
सम्यक बुद्धविहार पंचशीलनगर आणि परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई व पंचशील व निळ्या चक्रध्वज पताकांनी परिसर सुशोभीत करण्यात आला आहे.
गावातून सम्यक धम्मरथातून महामानवांच्या प्रतिमांची आकर्षक मिरवणूक काढण्यात आली. रथाचे सारथ्य साधना मुन्तोडे यांनी केले. रथासमोर दोनच्या रांगेत भीमकन्यांनी पथसंचालन करून महानवाला मानवंदना दिली.धम्मरथाच्या पाठोपाठ पांढऱ्या शुभ्र साड्या परिधान करून महिला व त्यांच्या पाठोपाठ पुरुष मिरवणुकीत चालत होते. या आकर्षक मिरवणुकीत सहभागी धम्मरथावर नागरिकांनी पुष्पवृष्टी केली.
मिरवणूकीच्या सांगता प्रसंगी मुलींनीच्या लेझीम पथकाद्वारे लक्षवेधक नृत्यविष्कार सादर करण्यात आला. प्रसंगी संगीत व्यवस्था गावातील ज्ञानेश्वर पांडे यांच्या वतीने ना नफा तत्वावर करण्यात आली.
जयंती समितीचे प्रमुख समन्वयक अनिल मुन्तोडे यांच्या अध्यक्षतेत अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले. यावेळी अध्यक्ष डॉ. निलेश मुन्तोडे यांनी प्रास्ताविक भाषणात जयंती समितीच्या कार्याचा आढावा व पुढील कार्यक्रमाविषयी माहिती दिली.
यावेळी अक्षय पवार, दिलीप बर्डे, निलेश ब्राह्मणे, आशुतोष कदम यांनी महामानव बाबासाहेब आंबेडकरांच्या सर्वसमावेशक कार्याचा परिचय करून दिला. यावेळी मंचावर भागवत मुन्तोडे, एकनाथ मुन्तोडे, राजेंद्र मुन्तोडे यांचेसह प्रमुख मार्गदर्शक हजर होते. यावेळी जयंती समितीने प्रमुख मान्यवरांचा सत्कार केला. लेझीम पथकाची सर्वांनी तोंडभरून स्तुती केली व त्याचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन सचिव राजेंद्र मुन्तोडे यांनी केले तर आभार प्रदर्शन सुशील मुन्तोडे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बबन मुन्तोडे, कैलास पगारे, कैलास मुन्तोडे, अखिल मुन्तोडे, सिद्धार्थ मुन्तोडे, अलिशा मुन्तोडे, रेणुका मुन्तोडे, वर्षा मुन्तोडे, संगीता मुन्तोडे व गौरव मुन्तोडे यांनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाच्या सांगतेप्रसंगी भोजनदानाचे आयोजन करण्यात आले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!