अंभोरे येथील दुचाकी स्वराचा कोळवाडे शिवारात संशयास्पद अपघात
 घात की अपघात ग्रामस्थांमध्ये चर्चेला उधाण 
पिंपरणे / लोकवेध live न्यूज 
पिंपरणे कोळवाडे रस्त्यावर कोळवाडे नजीक  पुलाचे काम सुरू असून या ठिकाणी सदर ठेकेदारांनी कोणत्या प्रकारची बॅरिकेट किंवा रस्ता वळण काही चिन्ह दाखवले नसल्याने रात्रीच्या वेळी दहाच्या सुमारास अंभोरे गावचे रहिवासी  माजी सोसायटी चेअरमन राधु गजबा कडणर वय 55 त्या ठिकाणाहून मोटरसायकल  वरून  जात असताना काम चालू आहे  याचा अंदाज न आल्याने गाडी सरळ खड्ड्यात जाऊन पडली या अपघातात राधु कडनर हे जागीच ठार झाले सदर घटना रविवारी रात्री  दहाच्या सुमारास घडल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे सकाळी या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या ग्रामस्थांनी सदर घटना पाहिली असता त्यांनी तात्काळ पोलीस पाटील शिवाजी पानसरे यांना सांगितली पोलीस पाटलांनी  सदर  घटना संगमनेर ग्रामीण पोलीस स्टेशनचे पीआय देविदास ढुमणे यांना कळवली त्यानंतर
 पोलीस कॉन्स्टेबल अमित महाजन संपत जायभाये आशिष आरोटे घटनास्थळी धावून आले पोलिसांनी ॲम्बुलन्स बोलवून सदर मृत्यू देह  संगमनेर कॉटेज हॉस्पिटल ला तपासणीसाठी नेला
यावेळी खड्ड्यातून मृत्यू देह बाहेर काढण्यासाठी कोळवाडे  चे सरपंच योगेश गुंजाळ महादू गोंधे  कोंडाजी कडनर यांनी मदत केली
सदर अपघात ठिकाणी कॉन्ट्रॅक्टर ने ज्या ठिकाणी पुलाचे  काम चालू आहे त्या ठिकाणी दोन्ही बाजूने लावणे गरजेचे होते तसेच सदर ठिकाणी काम चालू आहे असे बोर्ड लावण्याची गरज होती  साईड रस्ता काढला त्या ठिकाणी कोणतीही दिशादर्शक खून नाही  त्यामुळेच हा अपघात झाला असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे कॉन्ट्रॅक्टरच्या हलगर्जीपणामुळे हा अपघात झाला आहे सदर कॉन्ट्रॅक्टर वर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करून त्याचे लायसन रद्द करावे असे ग्रामस्थांचीं मागणी आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!