खांबे गावातील महिला दारूबंदीसाठी सरसावल्या

आठ दिवसात अवैदय दारु धंन्दे बंद न झाल्यास आश्वी पोलिस स्टेशनवर दारुबंदी करिता महीला मोर्चा आणण्यात येईल अशा इशारा खांबेच्या महीलांनी दिला .

 

संगमनेर : लोकवेध live न्यूज

 

संगमनेर तालुक्यातील पठार भागातील असणार्‍या खांबे येथील गावठाण हद्दीत हातभट्टीसह , देशी , विदेशी दारूची सर्रास विक्री होत असल्याने गावातील महिलांना यांचा मोठा त्रास सहन करावा लागत असल्याने महिलांनी 27 जानेवारीला ग्रामसभेमध्ये दारूबंदीचा ठराव प्रस्ताव मांडत तो ग्रामस्थांच्या उपस्थितीत मंजूर केला होता याबाबत अहमदनगर पोलीस अधीक्षक कार्यालय व आश्वी पोलीस स्टेशनला ग्रामपचायत ठराव व निवेदन दिले होते, मात्र पोलिस यंत्रणेकडून कुठलाचं प्रतिसाद न मिळाल्याने महीला आक्रमक होत 6 मार्चला ग्रामपचायत कार्यालयातचं ठिय्या आंदोलन केल्याने काही काळ गावातचं तणाव निर्माण झाला
यावेळी सरपंच रवींद्र दातीर, उपसरपंच भारत मुठे, ग्रा. प सदस्या मनीषा दातीर, मीना भांगे, रोहिणी कापडी, शितल कापडी, आदीसह महीला उपस्थित होते .
यावेळी निवेदनात म्हटले आहे की , गावातील दारुमुळे महिलांना मोठा शारीरिक आणि मानसिक त्रास त्यांच्या मालकांकडून होतो दिवसभर कष्ट करून महिला हया दोनशे रुपये कमवतात . उन्हातन्हात दिवसभर राबराबून सायंकाळी घरी आल्यानंतर दारु पिण्यासाठी पैसे मिळावे म्हणून शारिरीक व मानसिक त्रास सुरु होतो . या रोजच्या त्रासाला कंटाळून महिलांनी एकत्र येत थेट ग्रामपंचायत कार्यालयावरचं गावातील दारुबंदी करिता मोर्चा काढला . संरपच उपसंरपच यांना दारुबंदीचे निवेदन देत ग्रामसभेतून दारुबंदीचा ठराव मंजूर करा हा आग्रह धरला ! या मागणी वरून 27 फेबूवारीला झालेल्या ग्रामसभेतून दारुबंदीचा ठराव मंजूर झाला ठराव व निवेदन आश्वी पोलिस स्टेशनला देवूनही यावर कुठलीचं कारवाई न झाल्याने महीलांनी आक्रमक पावित्रा उचलत ग्रामपचायत कार्यालयातचं ठिय्या आंदोलन सुरु केल्याने संरपच रविद्र दातीर यांनी आश्वी पोलीस स्टेशनचे कॉन्स्टेबल, प्रमोद सोनवणे, आणि त्यांच्या सहकार्याना त्वरीत पाचारन केले . पोलिस सोनवणे यांना घटनास्थळी भेट देऊन त्वरित अवैदय दारू धंद्यांचा बंदोबस्त करू असं आश्वासन दिले . गावामध्ये कुठलीही हातभट्टी किंवा कुठलाही अवैध धंदा चालणार नाही असं देखील अश्वि पोलीस स्टेशनच्या वतीने सांगण्यात आल्याने येत्या आठ दिवसात अवैदय दारु धंन्दे बंद न झाल्यास आश्वी पोलिस स्टेशनवर दारुबंदा करिता महीला मोर्चा आणण्यात येईल अशा इशारा महीलांनी दिला .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!