जागतिक महिला दिनानिमित्त संगमनेर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने महिलांचा सत्कार व सन्मान

 

संगमनेर / लोकवेध live न्यूज 

 

आज दिनांक 8 मार्च 2023 रोजी जागतिक महिला दिनानिमित्त संगमनेर शिवसेनेच्या वतीने महिलांचा सन्मान करण्यात आला व त्यांना हार गुच्छ देऊन शुभेच्छा देण्यात आला. संपूर्ण जगात प्रगतीच्या बाबतीत महिलांचा पुरुषां एवढाच बरोबरीचा वाटा आहे, सर्वच क्षेत्रात योगदान आहे. आपल्या भारत देशातही महिलांना समान हक्क व पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून पुढे जाण्याची संधी मिळाल्याने महिला पुढे चालत आहे, शिवसेना पक्षात देखील महिलांचा नेहमीच आदर मान सन्मान राखला जातो व महिलांना संधी दिली जाते. शिवसेना पक्षाच्या महिला संपर्क नेत्या शुभांगी ताई पाटील, संपर्कप्रमुख बबन नाना घोलप व जिल्हाप्रमुख मुजीब शेख यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांचा सन्मान सोहळा एम एस इ बी येथील शमी गणपती मंदिराच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला होता.

यावेळी सामाजिक कार्यकर्त्या शिल्पा बोराडे, शुभांगी पगारे ,स्नेहा नवले, कोमल दामनी, स्वाती क्षीरसागर, पूजा मुंगसे, राज्यश्री भंडारी, अमृता करपे, सुफला तांबे, संध्या पावनखड, संगीताताई गायकवाड, आशा केदारी, सुरेखा गुंजाळ, जयश्री शेंडे यांचा सन्मान शिवसेना शहर प्रमुख अमर भाऊ कतारी यांच्या हस्ते करण्यात आला, यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख भाऊसाहेब हासे पाटील पठारभाग तालुकाप्रमुख संजय फड, युवा सेना जिल्हाप्रमुख अमित चव्हाण, युवा सेना तालुकाप्रमुख राजू सातपुते ,अनुप म्हाळस, शाखाप्रमुख अजीज मोमीन शिवसेना संगमनेर कार्याध्यक्ष दीपक जी साळुंखे, व व शिवसैनिक पदाधिकारी उपस्थित होते यावेळी बोलताना महिलांनी मनोगत व्यक्त करत संगमनेर शिवसेनेचे आभार मानले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!