डिग्रस मध्ये वीर एकलव्य जयंती उत्साहात साजरी
सामाजिक एकोप्याचे दर्शन
डिग्रस :-
संगमनेर तालुक्यातील डिग्रस गावातील एकलव्य संघटनेच्या वतीने वीर एकलव्य जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. डिग्रस गावातील आदिवासी बांधव व वीर एकलव्य संघटनेकडून एकलव्य जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. गावात प्रथमच आदीवासी बांधवानी एकजुटीने भव्यदिव्य मिरवणूक काढून जयंती साजरी केली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर प्रतिष्ठान या जयंती सोहळ्यात सहभागी होऊन वीर एकलव्य प्रतिमेचे पूजन करुन पुष्पहार अर्पण करत अभिवादन करण्यात आले.
संपुर्ण गावात एकलव्य प्रतिमेची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत आदीवासी बांधव व भगीनीनी आपल्या खास पारंपरिक शैलीत आदिवासी नृत्यावर ठेका धरला होता. आदिवासी बांधवांना व ग्रामस्थांना वीर एकलव्य यांच्या जीवनचरित्रावर विशाल वाघ, रविंद्र भालेराव, रविंद्र पुणेकर यांनी आपली मनोगत व्यक्त करताना आदीवासी बांधवांचे न्याय हक्क व सध्याची राजकीय सामाजिक परिस्थिती यावर भाष्य केले.
मिरवणुकीचे नियोजन व कार्यक्रम यशस्वीतेसाठी संजय वारे, शिवमनी मेंगाळ, रामा बर्डे, विशाल वाघ, सुनील वारे, करण बर्डे, गोकुळ बर्डे, पंकज मेंगाळ, विजय भले, अजय जाधव, संजय भालेराव, राजु जाधव, नवनाथ मेंगाळ, सचिन मेंगाळ, दादासाहेब मेंगाळ, सदाशिव मेंगाळ, संतोष मेंगाळ, संदिप मेंगाळ, अमर मेंगाळ, सोमनाथ जाधव, रंगनाथ मधे, राजु जाधव, गणपत बर्डे, संकेत जाधव,वामन वारे, जाखु जाधव, हिरामण केदार यांनी विशेष परिश्रम घेतले आहेत.संपत खेमनर, अशोक खेमनर,जानकीराम पुणेकर, दामु खेमनर, जमालभाई पठाण,म्हाळु वावरे, एकनाथ बिडगर, सोपान कोळेकर, ऋतुराज खेमनर, किशोर होडगर, व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सरपंच रंगनाथ बिडगर यांनी भुषविले, प्रास्ताविक सोपान तांबडे, अध्यक्षीय सूचना विठ्ठल नान्नर यांनी मांडली त्यास अनुमोदन बाळासाहेब वावरे यांनी केले, आभार प्रदर्शन राम बिडगर यांनी तर सूत्रसंचालन खंडु कोळपे यांनी केले.
