रिलायन्स पेट्रोलियम प्रेरणादायी उपक्रम :
कर्तुत्वान महिलांचा महिला दिना निमित्त गुणगौरव 
चंदनापुरी लोकवेध live न्यूज
 संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी येथे महिला दिनाचे औचित्य साधत कर्तुत्वान महिलांचा गौरव करण्यात आला आहे. चंदनापुरी गावातील रिलायन्स पेट्रोलियमकडुन  कर्तुत्वान महिलांचा मराठमोळ्या पध्दतीने फेटा,शाल आणि पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करत त्यांना पुढील वाटचालीस शुभच्छा देण्यात आल्या आहेत
यात आरोग्य सेविका,पोलिस महिला,डॉक्टर,कृषी क्षेत्र, शैक्षणिक,राजकीय, सामाजिक, अंगणवाडी सेविका, तलाठी मॅडम, तसेच अन्य क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांचा गुणगौरव करण्यात आला यावेळी येथे ग्रामसेवक संघटनेचे राजेंद्र पावसे,उपस्थितांचे स्वागत सौ कविता उत्तम चौधरी यांनी केले
 तर कार्यक्रमासाठी सरपंच, सर्व संस्थाचे चेअरमन व्हा. चेअरमन, सामाजिक कार्यकर्ते, सरपंच शंकर राहणे, अनिल संपतराव कढणे, रविंद्र सोमनाथ राहणे पोलीस पाटील ज्ञानदेव राहाणे, शाम राहाणे अंकुश राहणे, सुनील गंगाराम भालेराव, विलास राहणे, केंद्रीय मानवाधिकार संघनेचे  योगेश घोगरे, पत्रकार सोमनाथ काळे हे देखील उपस्थित होते तर उपस्थितांचे आभार संजय गंगाधर भालेराव व रिलायन्स पेट्रोलचे व्यवस्थापक उत्तम चौधरी व कर्मचारी यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!