महाराष्ट्र राज्य आरपीआय एकतावादी पक्षाच्या उत्तर महाराष्ट्र सरचिटणीस पदी सुखदेव भालेराव यांची निवड
 संगमनेर प्रतिनिधी / लोकवेध live न्यूज 
 मुंबई येथे आर पीआय एकतावादी पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणीची बैठक पक्षाचे  राष्ट्रीय अध्यक्ष मा गंगाराम इंदिसे नाना महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा विकास जी निकम पक्षाचे राष्ट्रीय नेते भैय्यासाहेब इंदीसे  यांच्या उपस्थितीत पार पडली असता सामाजिक कार्यकर्ते  सुखदेव भालेराव यांच्या चळवळीतील 32 वर्ष प्रदीर्घ अनुभवाचा व योगदानाचा विचार करून तसेच सामाजिक कार्याचा विचार करून त्यांना योग्य न्याय मिळावा यासाठी उत्तर महाराष्ट्र राज्य सरचिटणीस पदी त्यांची निवड करण्यात आली
मा सुखदेव भालेराव  हे नाशिक अहमदनगर जिल्ह्यातील सर्वांना परिचित तळागाळातील सामान्य जनतेची नाळ असणारे तसेच प्रचंड मोठा जनसंपर्क असणारे फुले शाहू आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते आहेत त्यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर नागरी सहकारी पतसंस्था आनंदवाडीचे चेअरमन पद भूषवले असून अहमदनगर जिल्हा दक्षता समितीचे ते सदस्य म्हणून पाच वर्षे सलग काम केले त्याचबरोबर विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांनी सलग दहा वर्ष त्या पदाला न्याय मिळवून सामाजीतील गोरगरिबांचे कामे मार्गी लावली तसेच महत्त्वाचे म्हणजे महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते महामहीम राज्यपाल रा सू तथा दादासाहेब गवई यांचे ते खंदे समर्थक असून त्यांच्याबरोबर चळवळीत त्यांनी योगदान दिले आहे त्याचबरोबर युवा नेत्या उत्कर्षताई रूपवते  युवा नेतृत्व जिल्ह्याचे एकतावादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष मा  किरण सुधाकर रोहम यांचे ते निष्ठावंत कार्यकर्ते आहेत गेल्या 32 वर्षापासून त्यांनी फुले शाहू आंबेडकर चळवळी साठी भरीव असे योगदान दिले आहे त्यानिमित्त समाजाने त्यांना समाजभूषण पुरस्कार तसेच अनेक सेवाभावी संस्थेचे त्यांना पुरस्कार प्राप्त झालेले आहेत   सहकार विभागाच्या वतीने सहकारनिष्ठ पुरस्काराने नुकतेच त्यांना गौरविले आहे  त्यांच्या निवडीबद्दल अनेक व्यक्तींनी सामाजिक चळवळीतील राजकीय नेत्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे विशेषता महाराष्ट्र राज्याचे माजी महसूल मंत्री मा ना बाळासाहेब थोरात मा डॉक्टर सुधीर जी तांबे  माननी
आ सत्यजित दादा तांबे मा इंद्रजीत भाऊ थोरात जिल्हा परिषद सदस्य मा मिलिंद कानवडे मा कैलासजी सरोदे राजेंद्र भालेराव मा बालम शेठ सरोदे प्राध संतोष भालेराव अशोक भालेराव ज्येष्ठ नेते कार्याध्यक्ष लक्ष्मणराव वाणि उत्तर नगर जिल्हा अध्यक्ष नानाभाऊ वाघमारे पक्ष प्रवक्ते प्रा बाळासाहेब वाघमारे जिल्हा सरचिटणीस रमेश रूपवते सर जिल्हा महिला अध्यक्ष विमलताई मोरे कल्पनाताई मनोहर जी बिडवे महाराष्ट्र राज्याचे नेते गौतमजी विघे जिल्ह्याचे नेते उपाध्यक्ष मा केशवराव विघे किरण भालेराव जिल्हा संपर्क नेते रावसाहेब जगताप अमोल जगताप संगमनेर तालुका सरचिटणीस अशोक बनसोडे संगमनेर शहर प्रमुख विनोद जी गायकवाड मेघाताई अभंग सुधाकरजी देवरे बाळासाहेब आढाव उत्तम जी आढाव झोळेकर ताई भास्करराव फापाळे महिला आघाडीने त्या हेमलाता ताई भालेराव यांनी अभिनंदन केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!