संजय गांधी निराधार योजना जुन 2024 अखेरचे 2 कोटी 48 लाख 4 हजार 800 रुपये लाभार्थी खात्यात वर्ग – अमोल खताळ पाटील
संगमनेर / लोकवेध live न्यूज / अण्णासाहेब काळे
राज्य सरकारच्या माध्यमातून सुरु असलेल्या संजय गांधी निराधार योजना अंतर्गत तालुक्यातील लाभार्थ्यांना जुन 2024 अखेर 2 कोटी 48 लाख 4 हजार 800 रुपये महसूल तथा पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विशेष प्रयत्नांमुळे लाभार्थी खात्यात आज वर्ग करण्यात आले आहे. अशी माहिती संजय गांधी निराधार योजना अध्यक्ष अमोल खताळ पाटील यांनी दिली.
संजय गांधी निराधार अनुदान योजना सर्वसाधारण 5240 लाभार्थ्याना 77 लाख 76 हजार 600 रुपये, माहे जुन 2024 चे संजय गांधी निराधार अनुदान योजना अनुसूचित जाती 562 लाभार्थ्याना 8 लाख 35 हजार 200 रुपये, माहे एप्रिल मे आणि जून 2024 चे संजय गांधी निराधार अनुदान योजना अनुसूचित जमाती 226 लाभार्थ्यांना 10 लाख 8 हजार रुपये, माहे जून 2024 चे श्रावणबाळ गट ब सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना सर्वसाधारण 5311 लाभार्थ्यांना 79 लाख 66 हजार 500 रुपये, माहे जून 2024 चे श्रावणबाळ गट ब सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना अनुसूचित जाती 695 लाभार्थ्यांना 10 लाख 42 हजार 500 रुपये, माहे एप्रिल आणि मे 2024 चे श्रावणबाळ गट ब सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना अनुसूचित जमाती 324 लाभार्थ्यांना 9 लाख 72000 हजार रुपये, माहे जून 2024 चे श्रावणबाळ गट अ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना 4028 लाभार्थ्यांना 52 लाख 4 हजार रुपये मात्र अनुदान लाभार्थ्यांच्या बँक खातेवर आज वर्ग करणेत आले आह.
तसेच संजय गांधी निराधार योजना समितीची बैठक लवकर घेणार असून कागदपत्रे परिपूर्ण असणाऱ्यांनी जमा करावी. तसेच ज्या महिला संजय गांधी निराधार मध्ये नियम, अटी पूर्ण करू न शकल्या नाही त्यांची प्रकरणे नामंजूर झालेली आहेत. त्यांनी मुख्यमंत्री- लाडकी बहिण योजना मध्ये लाभ घ्यावा असे आव्हान अमोल खताळ यांनी केले आहे. तसेच ज्यांना संजय गांधी योजना लाभ मिळत आहे त्यांनी लाडकी बहिण योजना साठी फॉर्म भरू नये.
संगमनेर तालुक्यात संजय गांधी निराधार योजना मेळावे गावागावात सुरु होणार आहे त्यामुळे नागरिकांनी कुठल्याही एजंट यांना कागदपत्रे, पैसे देऊ नये. महायुती सरकारतर्फे योजना तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहचविण्याचा आमचा संकल्प असून त्यसाठी जास्तीत जास्त लाभार्थी यांनी याचा लाभ घ्यावा. प्रकरणे नियमानुसारच मंजूर होणार असल्यामुळे फसवणूक होणार नाही याची काळजी घ्यावी. तसेच लाभार्थी म्हणून मानधन मिळण्यास काही अडचण येत असल्यास माझ्या संपर्क कार्यालयात अथवा नामदार राधाकृष्ण विखे पाटील जनसंपर्क कार्यालय, भाजप कार्यालय, संगमनेर येथे संपर्क साधावा असे आव्हान अध्यक्ष – संजय गांधी निराधार योजना, निवडणूक प्रमुख- संगमनेर विधानसभा भाजपा अमोल खताळ पाटील यांनी केले आहे.
