डॉ. जयश्रीताई थोरात यांच्याकडून कोठे बु येथील भालके कुटुंबीयांचे सांत्वन

तुषारचा मृत्यू हा अत्यंत दुःखदायक- डॉ. थोरात

संगमनेर / लोकवेध live न्यूज 

-शेतकरी कुटुंबातील तुषार हा पोलीस अधिकारी होण्याची स्वप्न घेऊन विविध स्पर्धा परीक्षा देत होता. पोलीस भरती सुरू असताना त्याच्या झालेल्या दुःखद निधनाने संपूर्ण संगमनेर तालुक्यात मोठी हळहळ निर्माण झाली असून ही घटना अत्यंत दुर्दैवी असल्याचे प्रतिपादन युवक काँग्रेसच्या अध्यक्षा कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात यांनी केले आहे .त्यांनी कोठे बुद्रुक येथे जाऊन भालके कुटुंबीयांची सांत्वन केले

कोठे बुद्रुक येथील गरीब व शेतकरी कुटुंबातील तुषार बबन भालके हा पुणे येथे विविध स्पर्धा परीक्षांसह पोलीस भरतीची तयारी करत होता. शिवाजीनगर कवायत मैदानावर पोलीस भरतीसाठी धावत असताना मैदानावर त्याला मृत्यू आला. या घटनेने पोलीस होण्याच्या स्पर्धेत तो जीवनाचा डाव हरला .आणि या घटनेने संपूर्ण संगमनेर तालुक्यासह तरुणांमध्ये मोठी हळहळ निर्माण झाली.

या घटनेची वृत्त समजतात काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी तुषारच्या निधनाबद्दल तीव्र शब्दात दुःख व्यक्त केले असून त्याच्या कुटुंबीयांना धीर देण्यासाठी सर्व ग्रामस्थ व कार्यकर्त्यांना सूचना केल्या याचबरोबर नातेवाईकांशी संवाद साधून सर्वांना धीर दिला.

तर यानंतर कॅन्सर त्यांनी डॉ जयश्रीताई थोरात यांनी भालके कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. यावेळी समवेत जिल्हा परिषद सदस्य अजय फटांगरे ,रमेश गफले यांसह गावातील विविध पदाधिकारी उपस्थित होते..

यावेळी डॉ जयश्रीताई थोरात म्हणाल्या की, अत्यंत गरिबीची परिस्थिती असल्या शेतकरी कुटुंबातील या मुलाने मोठी स्वप्ने पाहिली आणि त्यासाठी प्रयत्नही खूप केले. परंतु अर्ध्यावरच हा सर्व डाव मोडल्याने भालके कुटुंबीयांसह कोठे बुद्रुक गावावर मोठी शोककळा पसरली आहे. ही बातमी समजताच मला व आमदार थोरात यांनाही मोठे दुःख झाले आहे.आम्ही सर्वजण भालके कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी आहोत.

ज्याच्यावर घराची मदत आहे त्याच मुलाच्या आकस्मात जाण्याने मोठे संकट या कुटुंबावर ओढवले आहे. तरी शासनाने भालके कुटुंबीयांना जास्तीत जास्त मदत द्यावी अशी आग्रही मागणीही त्यांनी केली.

यावेळी अत्यंत शोकाकुल वातावरणात नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

काँग्रेस नेते आमदार थोरांतांकडूनही दुःख व्यक्त

पठार भागातील कोठे बुद्रुक येथील युवकाचा पुणे येथे पोलीस भरती दरम्यान झालेले निधनाचे वृत्त समजतात काँग्रेस विधिमंडळाचे पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी तुषार भालके यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले होते.तसेच कुटुंबीयांना ग्रामस्थांना व नातेवाईकांना फोन करून धीर दिला होता..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!