निराधारना मिळाला आधार.. खरीप पेरणीसाठी मोफत बी बियाणांचे वाटप.
संगमनेर /लोकवेध live न्यूज (संजय गोपाळे )
संगमनेर तालुक्यातील संगमनेर खुर्द गटात कार्यरत असलेल्या समाजसेवी संस्थेच्या वतीने गरीब, निराधार, विधवा, आदिवासी समाजातील सर्व शेतकरी बांधवांना सामाजिक सेवाभावी संस्था पै. राजन शिंदे युवा मंचच्या वतीने मोफत बी बियाणांची वाटप करण्यात आले आहे.
संगमनेर खुर्द गटामध्ये पै.राजन शिंदे युवा मंच यांच्या वतीने संस्थेचे प्रमुख समाजसेवक राजन शिंदे यांनी या भागात गोरगरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक कामासाठी आर्थिक मदत, दुष्काळग्रस्त, आदिवासी व दुर्गम भागात राहणाऱ्या गावांना गेली तीन महिन्यापासून टँकरने मोफत पाणीपुरवठा, गटातील प्रत्येक गावामध्ये आरोग्य शिबिर, दुर्धर आजारासाठी मोठी भरीव आर्थिक मदत, युवकांसाठी मोफत क्रीडा साहित्य वाटप, शालेय विद्यार्थ्यांना मोफत गणवेश, शालेय साहित्य, प्रत्येकाच्या सुखदुःखात सहभागी होऊन अविरत समाजसेवा करणारे राजन शिंदे हे खऱ्या अर्थाने समाजसेवक ठरले आहे. लहान,थोर,गरीब,, दिन दुबळे,, विद्यार्थी, आदिवासी बांधव, तरुण युवक यांच्या मदतीला कायम धावून जातात म्हणून त्याचे जणमाणसात जनसेवक म्हणून नावलौकिक झाले आहे.
नुकतेच त्यांनी संगमनेर खुर्द गटातील गटातील नांदुरी, सावरचोळ, मेंगाळवाडी, शिरसगाव,धुपे,पेमगिरी, निमज,मिर्जापुर, निमगाव खुर्द, धांदरफळ, झोळे, चंदनापुरी, सावरगाव, खराडी,वाघापूर इत्यादी ठिकाणी वाडी वस्तीवर जाऊन गरीब, मोलमजुरी करणारे आदिवासी, निराधार अश्या व्यक्तींना खरीप हंगामासाठी लागणारे मका, सोयाबीन,बाजरी, ज्वारी ई बी बियाणांचे वाटप करून मोठे समाज कार्य करत आहेत. त्यांच्या या दानशूर व्यक्तिमत्त्वाला संपूर्ण संगमनेर खुर्द गटात कौतुक होत आहे.
