जी.प.प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप व वृक्षारोपण.

संगमनेर / लोकवेध live न्यूज 

संगमनेर तालुक्यातील धंदारफळ खुर्द (मानकेश्वर मळा ) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप व वृक्षारोपण करण्यात आले.

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई, संगमनेर शाखेच्या वतीने धांदरफळ खुर्द येथील (माणकेश्वर मळा ) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील पहिली ते चौथी इयत्ता मधील शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना दप्तर,वही,पेन या शालेय साहित्याचे वाटप महाराष्ट्र राज्यचे राज्य सरचिटणीस डॉ. विश्वास आरोटे, संगमनेर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी अनिल नागणे, सामाजिक कार्यकर्ते राजन शिंदे, अ.नगर उत्तर जिल्हाप्रमुख सोमनाथ काळे यांच्या हस्ते करण्यात आले .व या शाळेच्या परिसरामध्ये गटविकास अधिकारी अनिल नागणे व राज्य सरचिटणीस डॉ. विश्वास आरोटे यांच्या हस्ते हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

ग्रामीण व अतिदुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची आवड निर्माण व्हावी,गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान व्हावा ही एक सामाजिक भावना डोळ्यासमोर ठेवून महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, संपूर्ण राज्यासह इतरही चार राज्यांमध्ये विविध सामाजिक उपक्रम निस्वार्थपणे राबवत आहे. दरवर्षी संपूर्ण राज्यातील विद्यार्थ्यांना एक लाख वह्या, व शालेय साहित्याचे वाटपाचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून राज्य पत्रकार संघ नेहमीच अग्रेसर आहे. या सामाजिक उपक्रमाबद्दल धांदरफळ खुर्द येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक,पालक, व सर्व विद्यार्थ्यांचे डॉ. विश्वास आरोटे यांनी कौतुक केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
संगमनेर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी अनिल नागणे यांनी या सामाजिक उपक्रमात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ,संगमनेर शाखेने विद्यार्थ्यांना शालेय साहित्याची वाटप करून या चिमुरड्याची मने जिंकली आहेत अशी भावना व्यक्त केली.
त्याप्रसंगी संगमनेर खुर्द गटात सातत्याने समाजसेवेचे वृत्त घेतलेले सामाजिक कार्यकर्ते राजन शिंदे यांनी गरीब विद्यार्थ्यांना गणवेश घेण्यासाठी आर्थिक मदत केली.
तसेच माणकेश्वर देवस्थानने शाळेच्या परिसरात वृक्षारोपण करण्यासाठी विविध फळांची रोपे देऊन मान्यवराच्या हस्ते वृक्ष्यारोपण करण्यात आले.
या प्रसंगी पत्रकार संघांचे तालुका अध्यक्ष संजय गोपाळे यांनी उपस्थित सर्व पत्रकार, शाळेचे शिक्षक, शिक्षिका, सर्व मान्यवर, सर्व स्थनिक स्वराज स्वस्थ्यांचे सरपंच, चेअरमन, देवस्थानचे सर्व सदस्य, शालेय शिक्षण कमेटीचे सर्व पदाधीकारी व सर्व विद्यार्थी, पलक यांनी या सामाजिक उपक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांचे अभिनंदन केले.
या कार्यक्रम प्रसंगी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघांचे सरचिटणीस डॉ. विश्वास आरोटे,संगमनेर पंचायत समितीचे गटविकास अधीकारी अनिल नागणे,समाजसेवक राजन शिंदे, अ. नगर उत्तर जिल्हा प्रमुख सोमनाथ काळे, जिल्हा संपर्कप्रमुख भाऊसाहेब वाकचौरे, अकोले तालुका उपाध्यक्ष अशोक शेळके, संगमनेर तालुका अध्यक्ष संजय गोपाळे,उपाध्यक्ष स्वानंद चत्तर, सचिव अमोल मतकर,सरपंच लता खताळ,उपसरपंच संदीप ठोंबरे,शाळेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संदीप गोडसे, ग्रामपंचायत सदस्य शरद कोकणे, ग्रामपंचायत सदस्य, संगीता गोडसे, राजेंद्र खताळ, सोसायटीचे चेअरमन मारुती काळे, पाटबंधारे विभागाचे अभियंता रजनीकांत कवडे,मुख्याध्यापक सुरेश कर्पे, बाळासाहेब चव्हाण , सर्व शिक्षक, शिक्षिका ,पत्रकार गोरक्ष नेहे, भारत रेघटे नितीन कोकणे पालक मोठया संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सी न्यूज मराठी वृत्तवाहिनीचे संचालक बाळासाहेब गडाख यांनी केले.. आभार व मार्गदर्शन भारत रेघाटे व सचिव अमोल मतकर यांनी मानले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!