संगमनेर तालुका युवक काँग्रेसच्या महासचिवपदी शुभम काळे 
संगमनेर / लोकवेध live न्यूज 
 संगमनेर तालुका युवक काँग्रेसच्या अध्यक्षा डॉ. जयश्री थोरात यांनी नुकतीच कार्यकारिणी जाहीर केली आहे. यामध्ये तालुक्यातील पिंपरणे येथील शुभम काळे यांची महासचिव पदी निवड झाली आहे. राज्यभरासह संगमनेर तालुक्यात अनेक युवक व युवती काँग्रेस पक्षात नव्याने सक्रीय झाले असून तालुका युवक काँग्रेसची नवीन कार्यकारिणी आमदार बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजीत तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली अध्यक्षा डॉ. जयश्री थोरात यांनी जाहीर केली आहे. यामध्ये पिंपरणे गावात राजकीय सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी व  संताजी महाराज योग मंडळाचे अध्यक्ष यांची युवक काँग्रेसच्या तालुका महासचिव पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. संताजी महाराज युवा मंचच्या माध्यमातून शुभम काळे यांनी अनेक लोकांना मदतीचा हात दिला आहे अनेक सामाजिक कामे करत आहेत. त्यांच्या याच कामाची पावती म्हणून त्यांच्यावर युवक काँग्रेच्या नूतन कार्यकारिणीत महत्वाची महासचिवपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीचे पिंपरणे ग्रामस्थांच्या वतीने स्वागत करण्यात आले पिंपरणे गावच्या वतीने  गावचे सरपंच नारायण मरभळ, ज्येष्ठ नेते सुधाकरराव रोहम शिवराम वाकचौरे तंटामुक्ती अध्यक्ष अरुण देशमुख राजेंद्र देशमुख काकासाहेब गायकवाड उपसरपंच मीनीनाथ जोर्वेकर, राजहंस दूध संघाचे संचालक रवींद्र रोहम, राजेंद्र सयाजी देशमुख संजय बागुल अजित मांडे, अजित देशमुख डॉक्टर किरण काळे उत्तमनाना राहींज  कल्याण जोर्वेकर निलेश बागुल राहुल बागुल सचिन जोर्वेकर सचिन राहींज राहुल निकम निलेश चत्तर संतोष वाकचौरे राजेंद्र वाकचौरे दत्तू काळे  धनंजय वाकचौरे सुजित देशमुख संजय साळवे संदीप साळवे सुरेश साळवे गोकुळ काळे मधुकर काळे उत्तम भालेराव दीपक अभंग यांनी शुभम काळे यांच्या निवडीचे अभिनंदन केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!