जेष्ठ नागरिक दक्षिण मराठवाडा प्रादेशिक विभाग अध्यक्षपदी डॉ. दामोदर थोरात तर सचिव पदी जगदीश जाजू यांची निवड

अंबाजोगाई / लोकवेध live न्यूज 

 

महाराष्ट्र जेष्ठ नागरिक महासंघ अंतर्गत दक्षिण मराठवाडा प्रादेशिक विभाग (फेसकॉम)च्या नुकत्याच झालेल्या त्रैवार्षिक निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून अध्यक्ष म्हणून डॉ. दामोदर थोरात (अंबाजोगाई ), उपाध्यक्षपदी अॅड. रमेश व्हटे (धाराशिव) तर सचिवपदी जगदीश जाजू (अंबाजोगाई) यांची निवड करण्यात आली आहे.
महाराष्ट्र जेष्ठ नागरिक महासंघ (फेसकॉम) ही जेष्ठांसाठी कार्य करणारी नोंदणीकृत सामाजिक संघटना असून महाराष्ट्रात या संघटनेचे एकूण १४ प्रादेशिक विभाग असून नोंदणीकृत २०९२ जेष्ठ नागरिक संघ कार्यरत आहेत. पैकी मराठवाड्यात दक्षिण मराठवाडा व उत्तर मराठवाडा प्रादेशिक विभाग असे दोन विभाग आहेत. यात दक्षिण मराठावाडा प्रादेशिक विभागात बीड, धाराशिव, लातूर व परभणी हे चार जिल्हे असून या जिल्ह्यात ४५५ जेष्ठ नागरिक संघ नोंदणीकृत व कार्यरत आहेत. नविन कार्यकारिणीतील इतर सदस्य पूढील प्रमाणे – सहसचिव- हरिशन्द्र राठोड(सत्तरधरवाडी, ता.औसा ), कोषाध्यक्ष-कांतराव गाजरे (माजलगाव) तर कार्यकारिणी सदस्य म्हणून रमेश कुलकर्णी (लातूर)अमृत टेकाळे (वाटवडा), अप्पाराव जाधव (राणीसावरगाव), सौ. विजया कातकडे (परभणी)यांची बिनविरोध निवड झाली असून त्यांचा कालावधी तीन वर्षाचा आहे. यात निवडणूक अधिकारी म्हणून दे.भ.पाठक(लातूर) यांनी काम पहिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!