चंदनापुरी येथील जिल्हा परिषद नूतन शाळेचे विद्यार्थीच्या हस्ते उद्घाटन संपन्न

संगमनेर तालुक्यात महायुतीच्या कामांची उद्घाटन महायुती नेते, पदाधिकारीच करणार – रामभाऊ रहाणे

 

संगमनेर / लोकवेध live न्यूज / अण्णासाहेब काळे

 

चंदनापुरी येथे लोकवर्गणी, ग्रामपंचायत फंड, वित्त आयोग यातून उभारण्यात आलेल्या शाळा खोल्या तसेच जिल्हा नियोजन समिती मार्फत देण्यात आलेल्या व्यायाम साहित्याचे उद्घाटन समारंभ आज शालेय विद्यार्थ्यांचे नकुल रहाणे, काव्या रहाणे, स्वरूप रहाणे, समर्थ रहाणे या विद्यार्थी यांच्या हस्ते संपन्न होऊन फटाके आतिषबाजी, मिठाई वाटून लोकार्पण करण्यात आले.

 

याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना रामभाऊ रहाणे यांनी मा.पालकमंत्री श्री. राधाकृष्ण विखे पाटील, शिक्षण मंत्री दीपक केसरकर, माजी खासदार श्री. सदाशिव लोखंडे यांचे विशेष आभार मानले. ज्याकामांसाठी निधी महायुती सरकारने दिला आहे त्याचे उद्घाटन, भूमिपूजन थोरात व कॉंग्रेसवाले करू पाहत आहेत चंदनापुरी येथील जिल्हा परिषद शाळा उद्घाटन उद्या होणार होते त्यासाठी शालेय व्यवस्थापन समितीला अंधारात ठेवून तसेच ज्यांची मुले जिल्हा परिषद शाळेत शिकतात त्या पालकांना अंधारात ठेवून काँग्रेसचे आमदार बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते शाळेचे उद्या होणार होतं त्यापूर्वीच महायुतीच्या वतीने आज ग्रामस्थच्या उपस्थितीत लोकार्पण करण्यात आले. ज्यांची मुले या शाळेत शिकत आहे त्यांना डावलून इंग्रजी माध्यमात शिकणारया मुलांचे पालक या शाळेमध्ये राजकारण करू पाहत आहे. त्यांनी आत्मपरीक्षण करावे असे शालेय समिती अध्यक्ष शाम रहाणे यांनी सांगितले.

 

प्रमोद रहाणे यांनी शालेय व्यवस्थापन समितीला उद्या होणाऱ्या कार्यक्रमापासून लांब का ठेवले असा प्रश्न विचारला तसेच कुठल्याही सरकारी कामाचे उद्घाटन भूमिपूजन करताना माननीय जिल्हाधिकारी यांनी काढलेल्या परिपत्रकानुसार होणे अपेक्षित असताना त्याकडे अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष का केले याबाबत आम्ही वरिष्ठांकडे दाद मागणार आहे असे सांगितले.

 

संगमनेर तालुक्यात यापुढे महायुतीच्या वतीने देण्यात आल्या निधी च्या कामाचे भूमिपूजन उद्घाटन हे फक्त आणि फक्त महायुतीचे नेते यांच्या हस्ते करण्यात येईल ज्या ठिकाणी थोरात व त्यांचे बगलबच्चे असा प्रयत्न करतील त्याला जशास तसे उत्तर देऊन तो कार्यक्रम म्हणून पाडला जाईल याची त्यांनी दक्षता घ्यावी असे संगमनेर विधानसभा प्रमुख भाजपा तथा संजय गांधी निराधार योजना समिती अध्यक्ष अमोल खताळ पाटील यांनी सांगितले.

 

याप्रसंगी श्री. अमोल खताळ पाटील, अध्यक्ष संजय गांधी निराधार योजना समिती, श्री. विठ्ठलराव घोरपडे, सदस्य जिल्हा नियोजन समिती, श्री. प्रमोद रहाणे, माजी सरपंच, श्री. रामभाऊ मार्तंड रहाणे, शिवसेना किसान आघाडी प्रमुख, श्री. शाम विजय रहाणे, अध्यक्ष शालेय समिती , श्री. राजेंद्र सोनवणे, संघटक शिवसेना, श्री. रवींद्र रहाणे, चेअरमन डॉ. बाबासाहेब आंबेडकर पतसंस्था, श्री. शाम रहाणे, अंकुश रहाणे ग्रामपंचायत सदस्य, श्री. नितीन रहाणे, रोहिदास रहाणे माजी उपसरपंच

श्री. धनंजय रहाणे, श्री. संजय भालेराव, श्री. योगेश घोगरे, श्री. गोरक्ष गोफणे, श्री. शांताराम बोऱ्हाडे संचालक डॉ. बाबासाहेब आंबेडकर पतसंस्था, श्री. बाळासाहेब सरोदे, श्री. किसन सरोदे, श्री. माधव शंकर रहाणे, श्री. सिताराम तुकाराम रहाणे, संचालक डॉ. बाबासाहेब आंबेडकर पतसंस्था

श्री. रोहिदास साबळे, जिल्हाउपाध्यक्ष किसान मोर्चा भाजप, श्री. गोरक्ष रहाणे, श्री. सुकदेव रहाणे

श्री. सोमनाथ रहाणे, माजी सरपंच, श्री. नाना रहाणे माजी चेअरमन श्री. राजेंद्र सातपुते व्हा. चेअरमन डॉ. बाबासाहेब आंबेडकर पतसंस्था, श्री. रोहिदास रहाणे, सुयोग रहाणे, करण शिरतार, श्री. सुरेश लहानु रहाणे, श्री. सागर रहाणे, शांताराम बोऱ्हाडे, संकेत रहाणे, आकाश रहाणे, गुलाब रहाणे, ऋषिकेश पवार, शरद गोफणे, शांताराम गोफणे, रोहित शिंदे, सुयोग गोफणे सह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थीत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!