हप्ते घेऊन बेकायदेशीररित्या सुरू असलेले अनधिकृत बस थांबा त्वरित बंद करून संबधित कर्मचारी,अधिकारी बस चालक यांचेवर कारवाई करा –अमर कतारी 

संगमनेर / लोकवेध live न्यूज / अण्णासाहेब काळे 

29/07/2024रोजी संगमनेर तालुक्यात व नगर जिल्ह्यात अनधिकृत बस थांबा तयार करून परिवहन महामंडळ चे अधिकारी कर्मचारी बस चालक हफ्ते घेत लाखोचा भ्रष्टाचार करत आहे याबाबत अमर कतारी यांनी आहे अ नगर येथील विभाग नियंत्रण शाखेतील अधिकाऱ्यांना पुराव्यासह तक्रार केली, कारवाई ची मागणी केली
सदर तक्रारीत
मी वरील तक्रारदार आपणास कारणे विनंती अर्ज करीत आहे की संगमनेर तालुक्यात आपण कोणत्याही अधिकृत हॉटेल ढाबा रेस्टोरंट ला अधिकृत बस थांबा दिलेला नाही, कर्मचारी व संबंधित अधिकारी एक बस साठी 1500 रुपये हफ्ता घेऊन अनधिकृत बस थांबण्याची परवानगी देत आहे, संगमनेर येथील हॉटेल पुरोहित मांची व कोकणगाव, ता संगमनेर, नगर– संगमनेर हायवे या ठिकाणी अनाधिकृत बस थांबत आहे, यापूर्वी देखील मोबाईलवर फोनवर आपणास लेखी तक्रार केलेली होती आपले स्तरावर कोणतीही कारवाई झाली नाही,
आपण ज्यांना कुणाला अधिकृत बस थांबा देतात त्यांच्याकडून लाखो रुपये डिपॉझिट घेतात अनेक अटी शर्तीचे पालन करण्यास सांगतात एका बस साठी 200 ते 400 रुपयांपर्यंत अधिकृत पैसे आकारतात, पाणी बॉटल आपल्याकडूनच अधिकृत असलेले च विकत घ्यावे लागते, ठरलेल्या किमतीपेक्षा जास्त किमतीत चहा नाश्ता जेवण विकता येत नाही, हॉटेल परिसराच्या आसपास किंवा हॉटेलमध्ये दारू विक्री करता येत नाही, ज्या ठिकाणी बस थांबा आहे त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे तसेच स्वच्छता ग्रह व स्वच्छतेबाबत विविध अटी शर्ती ठेवलेल्या आहेत, आपला कोणताही अधिकारी कधीही येतो व दादागिरी करून फुकटचे जेवण करून जातो, एसटी बस चालक कंडक्टर हे देखील प्रत्येक बस थांब्यावर पोटभर मनसोक्त फुकटचे जेवण करतात दुपारी जर गाडी अधिकृत थांब्यावर थांबली तर संध्याकाळचे जेवण देखील पार्सल घेऊन जातात, जाताना कोल्ड्रिंक पाण्याच्या बाटल्या देखील मोफत घेऊन जातात, बस थांबा असलेल्या प्रत्येक फेरीसाठी 100ते 200 रुपये बस चालक मागतात या सर्व गोष्टीमुळे अधिकृत बस थांबा वाल्यांना बस थांबा चालवणे परवडत नाही, परंतु आपले संबंधित कर्मचारी अधिकारी अनाधिकृत बस थांबा देण्यासाठी एका बससाठी 1500रुपये हप्ता आकारतात व बाकी कोणत्याच अति शर्थिची पूर्तता असेल नसेल याची पडताळणी देखील करत नाही, फक्त स्वतःचा खिसा गरम करून घेतात यात एसटी महामंडळाला देखील लाखो रुपयांचा चुना लागत आहे सदर अनधिकृत बस थांब्यावर कोणत्याही प्रकारचे सीसीटीव्ही कॅमेरे नाही तसेच अन्नाची पातळी स्वच्छतागृह व इतर कोणत्याही अटी शर्ती पाळलेल्या नसताना देखील फक्त आणि फक्त 1500 हप्ता मिळतो म्हणून प्रवाशांच्या जीवाशी आपले बस चालक व संबंधित कर्मचारीखेळत आहे हे त्वरित थांबवले नाही परिवहन मंत्री मुंबई महाराष्ट्र यांच्या दालनासमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल व होणाऱ्या सर्व पारीनामा ची जबाबदारी आपली राहील याची दक्षता घ्यावी, म्हणूनच सदर बस चालक संबंधित कर्मचारी अधिकारी यांच्यावर त्वरित कारवाई करावी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!