. . .आता तालुकाचं दत्तक घ्यावा लागेल : महसुल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील
मालुंजे येथे विविध विकास कामांचा उद्घाटन समारंभ संपन्न
संगमनेर / लोकवेध live न्यूज
मालुंजे व परिसरातील गावे ही दुर्लक्षित होती आपल्या सानिध्यात आल्यापासून पेयजल योजना , रस्ते आदीसह विविध विकासाला चालना मिळू लागली , यापुर्वी झालेले रस्त्यांना त्वरीत खड्डे पडत असल्याचे दिसले . कारण ठेकेदार ही घरातीलचं असायची आता तसेच राहिले नाही महायुतीच्या काळात सर्वांना काम करण्याची संधी देण्यात आल्याने चांगली व स्वच्छ पध्दतीने कामे होवू लागली यात तालुक्यातील विविध विभागाच्या अधिकाऱ्यांची ही तप्तरता दिसून येत असून तालुक्यातील भोजापूर पाणी पुजनासह विविध नऊ ठिकाणी कार्यक्रम असल्याने आता तालुकाचं दत्तक घ्यावा लागेल व विकासात्मक घोडदौड करावी लागेल असे प्रतिपादन संगमनेर तालुक्यातील मालुंजे येथील ६ कोटी २३ लाख रुपयेच्या विकास कामाच्या शुभारंभप्रसंगी महसुल मंत्री तथा पालकमंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले
यावेळी महसूल मंत्री राधाकृष्ण पाटील यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली तर क्रेनच्या सहाय्याने भव्य दिव्य पुष्पहारने त्यांचे स्वागत करण्यात आले त्यानंतर महसूल मंत्री विखे पाटील यांची पेढे तुला करण्यात आली
महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शुभहस्ते नवीन तलाठी कार्यालयाचे उद्घाटन संपन्न झाले हंगेवाडी ते मालुंजे रस्त्याचे मालुंजे ते पानोडी आदी कामांची उद्घाटन संपन्न झाले मालुंजे ते अंभोरे रस्त्याचा भूमिपूजन भूमिपूजन समारंभ संपन्न झाला
यावेळी जेष्ठ नेते दिलीपराव शिंदे , प स समिती माजी उपसभापती मच्छिद्र थेटे , प स समिती सदस्य गुलाबराव सांगळे , जेष्ठ नेते भगवानराव इलग , माजी संरपच संदिपराव घुगे , डिग्रस संरपच अशोकराव खेमनर , जेहूरभाई शेख , रावसाहेब घुगे , नानासाहेब शिंदे , पांडूरंग सांगळे , शरद भालेराव , प्रदिप दादा घुगे , सोसायटी माजी चेअरमन भिमाबाई घुगे , महिला संरपच सौ सुवर्णाताई घुगे , विजय डोंगरे , प्रांत शैलेंद्र हिंगे , तहसिलदार धीरज मांजरे , गटविकास अधिकारी अनिल नागणे , बांधकाम अभियंता मिसाळ , उपविभागीय कार्यकारी अभियंता वर्पे , कृषी अधिकारी गायकवाड , ग्रामसेविका श्रीमती रुपाली कहाणे आदीसह पदाधिकारी , अधिकारी , ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते .
ह भ प पांडुरंग महाराज घुगे काशिनाथ सोसे उपसरपंच अनिल आव्हाड दत्तू खरात योगेश गाभणे हिराबाई घुगे कैलास चौधर दत्तू दादा खरात संजय लहानू सोसे संदीप चौधर रामभाऊ चौधर मारुती नागरे आनंदा खरात सुखदेव खरात मधुकर खरात एकनाथ खरात विक्रम पुरी आधीसह बचत गटाच्या महिला सीआरपी महिला ग्रामस्थ मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते
कार्यक्रम संपल्यानंतर लाडक्या बहिणींनी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व मालुंजेचे माजी सरपंच संदीप घुगे यांना राख्या बांधल्या विखे पाटील यांना राखी बांधण्यासाठी महिलांची झुंबड उडाली
कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी सरपंच संदीप घुगे यांनी केले प्रास्ताविकात विविध विकास कामांची मागणी केली संदीप घुगे यांच्या मागणीनुसार गावातील आरोग्य केंद्र व मालुंजे येथे एस के एफ बारे काढून गावातील पाझर तलावात पाणी सोडणे या दोन मागण्या लवकरच पूर्ण करू असे आश्वासन महसूल मंत्री पाटील यांनी दिले
