श्री चक्रधर स्वामी अवतार दिन शासकीय  कार्यालयात साजरा
संगमनेर / लोकवेध live न्यूज 
5 सप्टेंबर 2024 रोजी  शासन निर्णयानुसार श्री चक्रधर स्वामी अवतार दिन शासकीय  कार्यालयात साजरा करण्यात आला .यानिमित्त नवी दिल्ली येथील नवीन महाराष्ट्र सदन येथे विद्वत परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.अवघ्या महाराष्ट्रातही  अगदी उत्साहात हा कार्यक्रम पार पाडण्यात आला आहे.तसेच संगमनेर येथील तहसील कार्यालय,नगरपालिका,कृषी कार्यालय,पोलीस स्टेशन,सर्व  शाळा,ग्रामपंचायत तसेच प्रांत कार्यालयात ही श्री चक्रधर स्वामी अवतार दिन साजरा करण्यात आला. माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे यांनी श्रीकृष्ण मंदिर, जनता नगर येथे भेट देऊन हा दिन साजरा केला.याप्रसंगी महानुभाव पंथातील अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!