आ.थोरात यांच्या प्रयत्नातून तालुक्यातील रस्त्यांसाठी 38 कोटी रुपये मंजूर
संगमनेर / लोकवेध live न्यूज
काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी सातत्याने निधी मिळवून संगमनेर तालुक्यातील प्रत्येक गावात व वाडी वस्तीवर विकासाच्या योजना राबविल्या आहेत. तालुका हा विस्ताराने खूप मोठा असून तालुक्यातील विविध गावांमधील रस्त्यांची मजबुतीकरण व डांबरीकरण या कामासाठी स्थानिक लोकप्रतिनिधीनीं सुचवलेल्या व पाठपुरावा केलेल्या कामांकरता अर्थसंकल्पातून 38 कोटी रुपये मंजूर झाले असल्याची माहिती थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजीतभाऊ थोरात यांनी दिली आहे.
या निधी बाबत माहिती देताना इंद्रजीत भाऊ थोरात म्हणाले की, माजी मंत्री आमदार थोरात यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील विकास कामांचा वेग कायम आहे. निळवंडेच्या डाव्या व उजव्या कालव्यांच्या कामासाठी आ. थोरात हेच सातत्याने पाठपुरावा करत असून तालुक्यातील विविध रस्ते व विकास कामे यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी सुचवलेल्या व पाठपुरावा केलेल्या कामातून रस्ते मजबुतीकरन व डांबरीकरणासाठी अर्थसंकल्पातून नव्याने 38 कोटी रुपये निधी मिळवला आहे.
या अंतर्गत राज्यमार्गांमधील राहाता ,लोहारे , निंमगावळजाळी, आश्वी, शिपलापूर , पानोडी, मांडवे या रस्त्या करता 95 लाख रुपये, मांडवे – साकुर – पिंपळगाव देपा- जोड रस्त्याचे बांधकाम करणे 75 लाख रुपये, कोतूळ – सावरचोळ – संगमनेर- तळेगाव- कोपरगाव रस्त्या करता 80 लाख रुपये, घुलेवाडी- सुकेवाडी या रस्त्या करता 3 कोटी रुपये, मांडवे – पिंपळगाव देपा या रस्त्याच्या सुधारणा करण्याकरता 2.5 कोटी रुपये, असे एकूण 8 कोटी रुपये तर प्रस्ताविक जिल्हामार्ग (प्रजीमा) अंतर्गत संगमनेर- कुरण – पारेगाव खुर्द- नान्नज दुमाला- पारेगाव बुद्रुक ते सिन्नर हद्द 3 कोटी रुपये, डीग्रस – अंभोरे – जाखुरी – निमगाव टेंभी – हिवरगाव पावसा – झोळे – मिर्जापुर – पेमगिरी रस्ता 1 कोटी 80 लाख रुपये, राष्ट्रीय महामार्ग 60 ते निमोन – देवकौठे रस्ता 1 कोटी 50 लाख रुपये, मेंढवन – कवठे कमलेश्वर – चिंचोली गुरव – जिल्हा हद्द 3 कोटी रुपये, डीग्रस – अंभोरे – निमगाव टेंभी – हिवरगाव पावसा- झोळे – मिर्जापुर – पेमगिरी 1 कोटी 55 लाख रुपये, विरगाव- गणोरे- जवळेकडलग – संगमनेर- 2 कोटी 60 लाख रुपये, निमोन – देवकवठे रस्ता 1 कोटी 70 लाख रुपये,(17-22), वाघापूर – देवगाव – निमगाव टेंभी – शिरापूर – मोदळवाडी – पिंपळगाव देपा – अंभोरे – जोरवे- वडगाव पान 1 कोटी 20 लाख रुपये, वडगाव लांडगा – कवठे धांदरफळ रस्ता 2 कोटी रुपये, कवठे कमलेश्वर – तळेगाव – चिंचोली गुरव – जिल्हा हद्द 1 कोटी, जवळे बाळेश्वर पेमगिरी रस्ता सुधारणे करणे 1 कोटी 50 लाख रुपये, समनापुर- पोखरी हवेली – कवठे कमळेश्वर लोहारे- आडगाव 2 कोटी 50 लाख रुपये , लोहारे – मेढवन – कोकणगाव – रहिमपूर 1 कोटी रुपये ,राष्ट्रीय महामार्ग 67 ते खरशिंदे- ताहाराबाद रस्ता सुधारणा करणे 1 कोटी 20 लाख रुपये, वडगाव लांडगा – धांदरफळ 1 कोटी 20 लाख रुपये ,संगमनेर- शिबलापूर- गुहा रस्ता 1 कोटी 50 लाख रुपये असे एकूण 30 कोटी रुपये. एकत्रित अर्थसंकल्पातून रस्ते मजबुतीकरण व डांबरीकरण या कामांसाठी 38 कोटी रुपये निधी मंजूर झाला आहे.
यामुळे संगमनेर तालुक्यात दळणवळणासाठी रस्त्यांचे मजबूत जाळे निर्माण होणार असून नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.हा निधी मिळवल्याबद्दल वरील सर्व गावांमधील नागरिकांनी काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांचे अभिनंदन केले आहे.
