मुख्याध्यापक संदीप सातपुते यांचा शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल गौरव..!!

डॉ. नंदकुमार घोडके यांच्या वाढदिवसानिमित्त विविध क्षेत्रातील कामगिरी करणाऱ्यांचा विशेष गौरव 

तळेगाव दिघे लोकवेध live न्यूज 

 

संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे येथील श्री. देवराम (दादा ) गोडगे पाटील प्रतिष्ठानच्या वतीने डॉ. नंदकुमार गोडगे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात संगमनेर तालुक्यातील सायखिंडी येथील श्री मनोहर बाबा विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री संदीप भानुदास सातपुते यांचा शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल “” शैक्षणिक आदर्श पुरस्कार “” देऊन माजी समाजकल्याण मंत्री आ. बबनराव घोलप साहेब यांच्या हस्ते नुकताच गौरव करण्यात आला.

आमदार बबनराव पाचपुते यांच्या हस्ते आदर्श शिक्षक पुरस्कार स्वीकारताना संदीप सातपुते सर

नंदकुमार घोडगे यांचा वाढदिवस साजरा

यावेळी डॉ अमेय देशमुख, पत्रकार रामनाथ बो-हाडे, पत्रकार दत्तात्रय घोलप, उद्योजक तुकाराम दिड्डी, रावसाहेब गुंजाळ, निलेश माळवे, संजय फड, भाऊसाहेब हासे आदींसह तळेगाव दिघे पंचक्रोशीतील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक गणेश दिघे यांनी केले.तर सुत्रसंचालन शिवशाहीर ह.भ.प. शरद ढवळे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!