कडक शिस्त, कमालीची तत्वनिष्ठा आणि प्रामाणिकपणामुळे त्यांची राज्यात विशेष ओळख होती – देशमुख
पिंपरणेत माजी मंत्री बि जे खताळ यांना अभिवादन
संगमनेर / लोकवेध live न्यूज 
 माजी मंत्री स्व बी.जे खताळ मंत्रिमंडळात असतांना सहकार, नियोजन, महसूल, कायदा व न्याय, अन्न व नागरी पुरवठा, सार्वजनिक बांधकाम, पाटबंधारे आदी खात्यांचा कारभार त्यांनी पाहिला आहे. प्रत्येक खात्यावर त्यांची विशेष अशी छाप होती. त्यांच्या कारकिर्दीत सर्वाधिक धरणांची निर्मिती झाली होती.
कोल्हापूरचे दुधगंगा-वेदगंगा, सांगलीचे चांदोली-नांदोली, पुण्याचे चासकमान , नांदेडचे विष्णुपुरीसह राहुरीच्या मुळा धरणाला गती देण्याचे काम त्यांच्याच काळात झाले होते. कडक शिस्त, कमालीची तत्वनिष्ठा आणि प्रामाणिकपणा यामुळे त्यांची राज्यात विशेष ओळख होती. असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते शुभम देशमुख यांनी केले
संगमनेर तालुक्यातील पिंपरणे येथे माजी मंत्री स्व .बी जे खताळ पाटिल यांच्या पुण्यतीथी निमित्त कार्यक्रमात ते बोलत होते
 कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून  युवा नेते शुभम देशमुख मंजाबापू साळवे अरुण देशमुख शिवराम वाकचौरे कैलास काळे उत्तमनाना राहिंज सुरेश ठोंबरे नंदू ठोंबरे दिनकर ठोंबरे किसन साळवे पिंटू खंडागळे रामनाथ ठोंबरे धोंडीबा साळवे  देवराम  वाकचौरे शामराव देशमुख सचिन खंडागळे  बाळासाहेब साळवे साहेबराव बागुल त्रिंबक गिरी  करण साळवे आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते
 शुभम देशमुख पुढे म्हणाले की, महाराष्ट्र राज्याच्या इतिहासाचे साक्षीदार आहेत! त्यांचे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत खूप मोठे योगदान आहे पाणीदार मंत्री म्हणून त्यांची राज्यात ओळख होती संगमनेर तालुक्याचे ते सहकाराचे जनक होते.पिंपरणे गावाच्या विकासासाठी त्यांचे मोलाचे योगदान आहे  साहेबांचे योगदान कधीही विसरता येणार नाही असे प्रतिपादन त्यांनी केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!