रमेश फिरोदिया महाविद्यालयात स्वच्छता ही सेवा अभियान संपन्न….
साकुर / लोकवेध live न्यूज
साकुर येथील रमेश फिरोदिया कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना व विद्यार्थी विकास मंडळ आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ,राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता ही सेवा (स्वभाव स्वच्छता- संस्कार स्वच्छता) हे अभियान राबविण्यात आले. 17 सप्टेंबर 2024 ते 2 ऑक्टोबर 2024 या कालावधीत महाविद्यालयात स्वच्छता पंधरवडा साजरा करण्यात आला.स्वच्छता ही सेवा उपक्रमांतर्गत स्वच्छता शपथ, महाविद्यालय परिसर स्वच्छ करणे, स्वच्छता जनजागृती रॅली, दत्तक गाव स्वच्छता, ऐतिहासिक व धार्मिक स्थळ स्वच्छता, नदी स्वच्छता, घर टू घर स्वच्छता,सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ करणे व पथनाट्य असे विविध उपक्रम राबविले गेले.
स्वच्छता ही सेवा निमित्ताने सर्व स्वयंसेवकांनी महाविद्यालयीन परिसर, बिरोबा मंदिर, बस स्थानक,ग्रामीण रुग्णालय, ग्रामसचिवालय, अमरधाम ,पुरातन महादेव मंदिर, बाजार तळ, आदिवासी सांस्कृतिक भवन, वीरभद्र माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय परिसर स्वच्छ करून प्लॅस्टिक कचरा गोळा करून त्याचे निर्मूलन केले.
गावामध्ये स्वच्छतेविषयी जनजागृती व्हावी यासाठी स्वच्छता रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. याअंतर्गत स्वयंसेवकांनी महाविद्यालय ते बस स्थानक, ग्राम सचिवालय, मुख्य बाजारपेठ येथून प्रभात फेरीचे आयोजन केले होते. स्वच्छ भारत सुंदर , स्वच्छता शिका आरोग्याला जिंका, स्वच्छता असे जिथे आरोग्य वसे तेथे, ध्यास स्वच्छतेचा ध्यास प्रगतीचा, स्वच्छता पाळा रोगराई टाळा, महात्मा गांधींचा एकच नारा स्वच्छ सुंदर भारत घडवा अशा घोषणा देऊन लोकांचे प्रबोधन केले. स्वच्छता ही सेवा या पथनाट्याचे सादरीकरण महाविद्यालयात स्वयंसेवकांनी केले.
महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. हेमलता राठोड यांनी स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले, त्या म्हणाल्या की, राष्ट्र उभारणीमध्ये तरुणांनी स्वच्छता अंगीकारून सुदृढ भारत निर्माण करण्यास योगदान द्यावे. स्वयंसेवकांना स्वच्छतेचे महत्त्व व ती आपल्या अंगी का रुजवली पाहिजे याची सखोल मार्गदर्शन केले. महात्मा गांधीजी यांना स्वप्नातील भारत देश अभिप्रेत होता.महात्मा गांधींनी जी स्वच्छतेची संदेश दिले ते आपण पुन्हा एकदा अंगीकारण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. सचिन घोलप यांनी स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत राबविल्या जाणाऱ्या उपक्रमांची माहिती स्वयंसेवकांना दिली. राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून महाविद्यालयीन युवकांनी व्यक्तिमत्व विकास करून विद्यार्थ्यांनी समाजसेवेचे व्रत हाती घेऊन स्वच्छता अभियानातून समाज प्रबोधन घडवून आणावे असे प्रतिपादन केले. 2 ऑक्टोबर रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधींची जयंती महाविद्यालयात साजरी करण्यात आली. हा दिवस स्वच्छ भारत दिवस म्हणून साजरा करण्यात आला.
राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. म्हतू खेमनर यांनी सर्व विद्यार्थ्यांना स्वच्छतेची शपथ दिली. यावेळेस महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.हेमलता राठोड, उपप्राचार्य डॉ.सचिन घोलप, विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. गणेश साळुंके सर्व प्राध्यापक प्राध्यापिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. या अभियानाच्या यशस्वीतेसाठी विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. गणेश साळुंके,राष्ट्रीय सेवा योजनेचे सह कार्यक्रम अधिकारी प्रा.योगेश साळुंके,प्रा. राजेंद्र लेंडे, प्रा.पोपट खेमनर, प्रा. स्वाती सागर, प्रा. शबाना शेख, प्रा. लक्ष्मण कातोरे यांनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक राष्ट्रीय सभेचे कार्यक्रम अधिकारी प्रा.म्हतू खेमनर यांनी केले तर आभार सह कार्यक्रम अधिकारी प्रा.राजेंद्र लेंडे यांनी मानले.
